निघाले सासुरा - 1

(12)
  • 19k
  • 1
  • 12.1k

१) निघाले सासुरा! शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेलं 'सावधान' हे मंगल कार्यालय केवळ त्या शहरातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील अनेक गावातील लोकांचे आवडते मंगल कार्यालय होते. सावधान कार्यालय अस्तित्वात येत असताना तो परिसर अगदीच निर्मनुष्य नसला तरी नेहमी शुकशुकाट मात्र नक्की असायचा. मंगल कार्यालयाची उभारणी झाली. त्या कार्यालयात सुरुवातीला काही 'शुभ मंगल' झाले तसे हळूहळू त्या परिसरात सिमेंटचे जंगल वाढले. अत्यंत देखणे, सुबक आणि लग्न समारंभात लागणारी हवी ती वस्तू मिळणारे मंगल कार्यालय म्हणून सावधान