चंद्रदेव दर्शनायाला लागले तसं मैदानाच्या कोपर्यात पडलेल्या हातभर व्यासाच्या पाईपातून त्याने तोंड बाहेर काढलं. अवतीभवती अंधाराची काळी सावली पसरू पाहत होती. मैदानावर खेळणारी पोरेही एव्हाना पांगली होती. नाही म्हणायला त्या मैदानाला लागूनच असलेल्या चाळीतून थोडाफार कल्लोळ ऐकू येत होता. बाकी एखादे आजोबा कुठं बाकड्यावर शांत चित्ताने बसले होते. बाहेरचं वातावरण खरंच आता निवांत असं झालं होतं. यानं एकदा उजवीकडं एकदा डावीकडं मान फिरवत पाहीलं.. बाहेर पडायला पाऊल पुढे टाकनार तोच.... 'रिश्ते में तो हम त