तोच चंद्रमा.. - 15

  • 5.2k
  • 1.8k

१५ टायटॅनियन भेट टायटन आणि आमच्या घरचे काय नाते असावे? टायटनचे शिष्टमंडळ आॅफिसच्या कामासाठी आलेले. त्यांनी वाकडी वाट करून आमच्या घरी यायचे काही कारण नव्हते खरेतर. पण बाबांना दुसऱ्या दिवशी सकाळी काॅल आला त्यांचा. इकडच्या लोकांशी संबंध जोडणे म्हणजे डिनर डिप्लोमसी आली! आईने आजवर टायटनचे नावही ऐकले नव्हते! खरेतर त्यांची ही पहिली भेट नव्हती चंद्रावर पण आईला ते माहिती असायचे कारण नसावे.. हे टायटन काय आहे हो? कुठल्या देशात आहे? ओळख? मी काय ओळखणार.. फार पूर्वी म्हणजे मी काॅलेजात असताना टायटन नावाची घड्याळे असायची एवढीच माहिती आहे मला. मला माझ्या बाबांनी बक्षीस दिलेले एक बीए झाले तेव्हा. राॅबिन