"काका अहो हव तर पाय पडतो मी.., पण मला दर्शन घेऊ द्या. कोणाच्या तरी जीवनमरणाचा प्रश्न आहे ओ.." त्याने तर त्यांचे पायच धरले. कोणाच्याशी समोर न झुकणारा आज मात्र त्यांच्याकडे विनवण्या करत होता. त्याच्या अनवाणी रक्त आलेल्या पायांना बघून त्यांचं ही मन नकार देऊ शकल नाही.. आणि त्या काकांनी त्याला दरवाजा उघडून दिला. "बर बाळा लवकर कर.." ते फक्त एवढंच बोलले. त्याने मानेने होकार देत तो आत गेला.समोर गणपतीची मूर्ती.. डोळे बंद करून त्याच्या समोर हात जोडले निशांतने.. "देवा.., का रे तिच्यासोबत एवढं वाईट व्हावं. मरण्याच्या दारात उभी आहे. खुप मानते रे तुला, तुझी भक्ती भावाने पुजते.. तिच्या बापतित नको