जुळले प्रेमाचे नाते - भाग-३६ Hemangi Sawant द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जुळले प्रेमाचे नाते - भाग-३६

"काका अहो हव तर पाय पडतो मी.., पण मला दर्शन घेऊ द्या. कोणाच्या तरी जीवनमरणाचा प्रश्न आहे ओ.." त्याने तर त्यांचे पायच धरले. कोणाच्याशी समोर न झुकणारा आज मात्र त्यांच्याकडे विनवण्या करत होता. त्याच्या अनवाणी रक्त आलेल्या पायांना बघून त्यांचं ही मन नकार देऊ शकल नाही.. आणि त्या काकांनी त्याला दरवाजा उघडून दिला. "बर बाळा लवकर कर.." ते फक्त एवढंच बोलले. त्याने मानेने होकार देत तो आत गेला.


समोर गणपतीची मूर्ती.. डोळे बंद करून त्याच्या समोर हात जोडले निशांतने.. "देवा.., का रे तिच्यासोबत एवढं वाईट व्हावं. मरण्याच्या दारात उभी आहे. खुप मानते रे तुला, तुझी भक्ती भावाने पुजते.. तिच्या बापतित नको रे एवढा कठोर होऊस. माझे आई-बाबा गेले त्या दिवसापासून मी तुला मानलं नाही.. ती आली आणि तिने मला तुझ्यावर विश्वास ठेवायला शिकवला. आणि आता तिला माझ्यापासून दूर घेऊन जातो आहेस."


"माझं आयुष्य तिला लागु दे. पण तिला वाचावं. काही नको रे आयुष्यात फक्त एकदा माझ्या प्रेमाला माझ्यापासून दूर करू नकोस. तुझी भक्तिभावाने पूजा करेन. बस तिला वाचावं." एवढं बोलून तो खाली पडला. बाहेर उभ्या काकांनी त्याला काही लोकांच्या मदतीने बाहेर आणलं. पाणी मारल त्याच्या तोंडावर तरीही त्याच्या तोंडात देवाचच नाव. एका ठिकाणी झोपव्यात आल त्याला...



पहाटेच्या आरतीने निशांतची झोप उडाली. डोळे उघडले तर तो झोपला होता.. घाईतच तो बाहेर आला. सिद्धिविनायक मंदिराच्या समोर तो उभा होता. स्वतःच्या डोक्यावर हात मारत निशांतने लांबुनच देवासमोर हात जोडले आणि तो तसाच रस्त्याने निघाला. चालतच तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला असता समोर बाबा..


निशांतला बघून त्यांनी तर त्याला मिठीच मारली. "निशांत प्राजु.. माझी परी.." ते रूमकडे हात दाखवत होते. "काय झालं बाबा..?? ती ठीक आहे ना..??" निशांत धावतच रूम च्या दिशेने निघाला सोबत बाबा होतेच. तर आता बेडवर मी चक्क आई सोबत गप्पा माहित होते.. हे बघून तर त्याने देवाचे आभारच मानले.

मागुन डॉक्टर आले.. "मिस्टर प्रधान.. आता तुमची मुलगी छान आहे हो. म्हणजे आतापर्यंत मी पाहिलं आहे पेशन्ट शुद्धीत येतो आणि त्याला वेळ लागतो कव्हर व्हायला. पण तुमची मुलगी तर चक्क बडबड करते. खरच देवानेच तिला एवढी शक्ती दिली असावी. कोणी तरी खूपच मनापासून प्रार्थना केलेली दिसते आहे." एवढं बोलून ते हसले आणि निघून गेले. बाबांनी ही देवाचे आभार मानले.



निशांत रूममधे आला. "काय मॅडम अजून बर वाटत नाहीये तुला आणि गप्पा कसल्या मारत आहेस." हे निशांत आत येताच माझ्या फेसवर एक मोठी स्माईल आली. "मग काय मी गप्प झाले तर सगळे रडत होतात ना म्हणून गणु ने पाठवलं मला आणि बोलला की, सर्वाना छान हसवं." माझं बोलण ऐकून तर निशांतचे डोळेच भरले.


आम्ही बोलत असताना आई बाहेर गेली. आता त्या रूममधे होतो आम्ही दोघेच. "कस झालं हे सगळं..? काय गरज होती तुला एकटीने जायची आणि मुळात तु गेलीसच का..??" निशांत जरा ओरडतच बोलला.... "आता बरी झाली आणि ओरडतोस काय माझ्यावर. परत गप्प होईन हा मी." एवढं बोलून मी हाताची घडी घालून मान फिरवली. हे बघताच निशांतने मागून मिठी मारली आणि रडायला लागला.


आज त्याला एवढं रडताना बघून माझे ही डोळे पाणावले.. "अरे बाबु काय झालं..?? रडत का आहेस..? बघ आले की नाही मी परत. मला काही नाही होणार तु नको टेंशन घेऊस." मी त्याचे डोळे पुसत बोलले. "पण तरीही हे सगळं कसं झालं..?? मी तुला गार्डन मध्ये बसायला सांगितलं होतं. मग तु तिकडे कधी पोहोचलीस." निशांत रडतच बोलला.



यावर मी काही ही न लपवता. सगळं काही निशांतला सरळ सांगुन टाकलं. आणि जे नको व्हायचं होत तेच झालं. "आता ती माझ्या हातातुन मेलीच..." एवढं बोलून तो रागात निघाला हे बघून मी खाली उतरण्याचा प्रयत्न करताना बेडवरून खाली पडले.


निशांत लगेच धावत आला आणि मला बेडवर ठेवलं.. "अग काय हे हनी-बी...? अजून ठीक झाली नाही आहेस.. कळलं तुला." मला उचलून ठेवत तो बोलला. "मग तु आता त्या हर्षल ला ओरडायला किव्हा काही बोलायला जाऊ नकोस. आपण रीतसर पोलिसांना सांगु. जरा वेळाने पोलीस येतीलच. ते डॉक्टरांना भेटायला त्यांच्या केबिनमध्ये गेले आहेत." मी बेडवर झोपत बोलले.


हे ऐकून कुठे निशांत शांत झाला, नाही तर आज एक खुण तर निशांरनेच केला असता. आम्ही बोलत असताना डॉक्टर आणि सोबत पोलीस आले. त्यांना मी न घाबरता सर्व काही सांगून टाकले आणि रीतसर हर्षल बद्दल ची कंप्लेट केली. सगळं नोट करून पोलीस गेले. मला ही डॉक्टरने आराम सांगितला. तास निशांत बाहेर जायला लागला आणि खाली फरशीवर त्याच्या पायाचे ठसे आणि सोबत रक्त. हे बघून मीच ओरडले..



"निशांत पायांना काय झालं..?? रक्त येत आहे." मी बोलल्यावर त्याला कळलं की रक्त आला आहे ते. मग मला न पटणारी उत्तर देऊन तो बाहेर गेला. नर्स ला सांगून त्याने पायाची ड्रेसिंग कायुन घेतली. काही वेळाने परत येऊन बसला. माझ्या शेजारी. तसे निशांत सोडून सगळे घरी गेले. फ्रेश होऊन बाबा आले. आणि निशांत गेला.


माझे मेडिकल रिपोर्ट्स काढण्यात आले ज्यात सर्वकाही ठीक होत. अस डॉक्टरने सांगितलं. घरच्यांनाही सर्वकाही पोलिसांकडून कळलं होतं. आज काल निशांत माझी जरा जास्तच काळजी घेत होता जे राजला बिलकुल आवडत नव्हतं. तो देखील मग माझी काळजी घेई. त्या दोघांमध्ये तर कॉम्पेटेशनच लागलं होतं कि, माझी जास्त काळजी कोण घेत आहे.


त्यादिवशी निशांत आई नसल्याने मला भरवत होता. "हनी-बी घे चल..आ कर." मी नको नको म्हणत असताना ही तो मला खायला भरवलं होत. "तु पण घे ना आणि खा.. मी तुला भरवते.." अस बोलून मी एक घास त्याच्या समोर केला. पण त्याने तो खाल्ला नाही. जरा विचित्र वाटलं मला. "काय झाल मी भरवलेला घास पण नको का आता..??"मी जरा लटक्या रागात बोलले. "अस नाही ग नंतर खाईन मी, तुला आता गोळ्या घ्यायच्या आहेत ना." अस बोलून त्याने ते टाळलं.


मग मी देखील काही आग्रह केला नाही. नंतर झोपले. मेडिसिनमुळे मला सारखी झोप यायची. संध्याकाळी आजी-आजोबा ही आलेले भेटायला. निशांत घेऊन आलेला त्यांना.
"काय बाळा हे अस काय करून घेतलंस.???" आजोबा बसतच बोलले. "काय करणार आजोबा. तुम्ही रोज गोळ्या खाता ना मग म्हटलं आपण ही काही तरी करून घेऊ म्हणजे आपल्याला ही छान गोळ्या खायला मिळतील" मी जीभ ओठांवर फिरवत बोलले. हे ऐकून सगळेच छान हसले.



"लबाड मुली. हे घे तुझ्यासाठी नारळ पाणी." माझ्या जवळची एक बॉटल माझ्या हातात देत बोलले. "आपल्या घरच्या नारळाचं आहे हा बाळा लवकर पी." त्यांनी हसुन सांगितलं. आणि मी लगेच बॉटल तोंडाला लावली. थोडं बोलून आजोबा बाबांना भेटायला गेले सोबत निशांत ही. आता रूममधे मी, आजी आणि आई होतो.


"अग..., आज काय झालं माहीत आहे का!!.. निशु बाळ लवकर उठला. तसा तो लवकरच उठतो. पण आज लवकर उठून त्याने चक्क गणतीची पूजा केली." आजी कौतुकाने सांगत होत्या. हे ऐकून तर माझे डोळेच चमकले. "बापरे हा खडूस कधीपासून धार्मिक झाला." मी स्वतःशीच पुटपुटले.



"तुला सांगते प्राजु बाळा. आई-बाबा गेले तेव्हा खुप लहान होता. नाही कळलं त्याला. पण जेव्हा कळायला लागलं ना खूप रडला होता. आणि त्यानंतर सगळं बंद. रडणं वैगेरे. पण तुझ ऍकसिडेंट झाल तेव्हा मात्र मला कॉल वर सांगताना इतका रडत होता." हे ऐकून तर माझं आता निशांतवरच प्रेम अजूनच घट्ट आणि वाढलं होत.


असाच तो दिवस गेला. सगळे काळजी घेत होते माझी, छान वाटत होतं. कोणाला नको असत आपल्या जवळच्या व्यक्तीने आपली काळजी घेतलेली नाही का.??!!........


to be continued......



(कथेचा हा पार्ट कसा वाटला हे नक्की सांगा. कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)


स्टेय ट्युन अँड हॅपी रीडिंग गाईज.