जुळले प्रेमाचे नाते - भाग-५ Hemangi Sawant द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जुळले प्रेमाचे नाते - भाग-५

निशांतला भेटुन आज मी घरी येऊन जरा फ्रेश होऊन थोडा अभ्यास केला. उद्या बराच वेळ बाहेर जाणार त्यामुळे आजच मी माझा अभ्यास पूर्ण केला. सगळा अभ्यास संपवून बाहेर आले. "आई.., मी काय घेऊन जाऊ उद्या निशांतच्या घरी.??" "त्याला काय आवडत ते बनव."

"ए आई मला नाही म्हाहित त्याला काय आवडत... तूच सांग काय बनवु ते....." एक काम कर छान खोबऱ्याच्या वड्या घेऊन जा. त्याला ही आवडतील नक्कीच. मला देखील ते पटलं. मग मी किचनमध्ये जाऊन खोबऱ्याच्या वड्या केल्या. मदतीला आई होती म्हणून लवकर झाल्या. सगळं आवरून मी झोपायला गेले. पण उद्या जायचं म्हणून झोप काही येत नव्हती. सारख आज घडलेलं आणि निशांतच बोलण आठवत होतं... ते आठवुन मी गालातल्या गालात हसत ही होते. हळुहळू डोळे जड होत, मी कधी झोपी गेले हे मला ही कळलं नाही.

सकाळी आईच्या हाकेने माझे डोळे उघडले. "प्राजु बाळा जायचं आहे ना चल लवकर उठ.." मी ताडकन बेडवर उठुन बसले आणि फ्रेश व्हायला गेले. आल्यावर घडाळ्यात पाहिलं तर आठ वाजले होते. स्वतःच्या डोक्यावर हात मारत स्वतःशीच पुतपुटले.. ही आई पण ना..

मग कपाट उघडल, पण सुचत नव्हतं काय घालु.. पहिल्या दिवशी मी डायरेक्ट गेले होते म्हणून जीन्स घातली होती. त्यामुळे आज ड्रेस घालून जायचा ठरवला. लाईट ग्रीन कलरचा कुर्ता आणि त्याखाली ब्लू लेगिन्स. असा सिम्पल कॉम्बिनेशन घालायचं ठरलं. कानात ओक्साइडचे लॉंग कानातले, डोक्यावर ब्लॅक टिकली. एका हातात घड्याळ आणि दुसऱ्या हातात कड. डोळ्यांना आयलाईनर आणि हाय पोनीटेल. एकदम लाईट अशी पिंक लिपस्टिक आणि माझ्या आवडत्या स्किन टायटन मधला नूड परफ्यूम आणि मी निघायला तय्यार झाले. खाली आले तर बाबा नाश्ता करत बसले होते.

पेपर वाचताच त्यांनी विचारल...,"मग आज कुठे निघाली माझी परी.." बाबा मी माझ्या एका फ्रिएन्डच्या घरी जातेय. वाह..!! जावा जावा.. पण लवकर ये हा बाळा. काळजी घे. मी पण लवकर नाश्ता करून किचनमध्ये गेले. " आई...,! माझा टिफिन कुठे आहे वड्यांचा..??


" घे फ्रीजमध्ये ठेवलाय.. आईचा बाहेरूनच आवाज आला. आई-बाबांना बाय करून मी निघाले.
निशांत ला कॉल केला तर हा बिल्डिंगच्या जवळ पाच मिनिटात पोहोचत होता. मी खाली आले..... काय काका कसे आहात.. मी छान..! तु कशी आहेस..मी देखील मस्त एकदम. व्हॉचमेन काकांशी बोलून मी निघाले.

मी चालत मेन रोड जवळ आले. मीच त्याला तिकडे थांबायला सांगितले होतं. काय आहे ना आमच्या बिल्डींग मधली लोकं सीसीटीव्ही कॅमेरे आहेत... कोणी कोणासोबत जरा बोलताना दिसले की ठरवुनच टाकतात की ते कपल असतील, म्हणून हा खटाटोप.

मी चालत त्याच्या जवळ पोहोचले तर हा मोबाईलमध्ये डोकं टाकून बसला होता. मी जाताच त्याच्या मोबाईल वर स्वतःचा हात ठेवला.. 'ए हनी-बी स्वतःचा हात काढ... त्याने माझा हात बाजुला केला आणि मला बघतच राहिला... पाच- सहा मिनिटे तो फक्त मला बघत होता.


मग मीच त्याच्या समोर टिचकी वाजवली..हॅलो काय झालं...?? कुर्ता चांगला नाही का..? थांब बदलून येते हवं तर... मी जाणार होते की त्याने माझा हात थरून थांबवलं. "अरे..! काही काय.. मस्त दिसतेस.. बस बघत राहवस वाटत आहे.".... काय बोललास..?. "काही नाही चल उशीर होईल असं म्हणालो......" स्वतःची जीभ चावत त्याने बाईक स्टार्ट केली.

आज जास्त वाहन नसल्याने निशांत बाईक फास्ट चालवत होता. एका स्पीडब्रेकर वरून जाताना त्याचा हलका धक्का मला लागला आणि मी शहारले. बाईक पंधरा मिनिटात त्याच्या बंगल्या समोर पोहोचली.


मी बाईक वरून उतरून आत शिरले तर आज आजोबा माझ्या स्वागतासाठी बाहेरच्या झोपल्यावरच बसून होते. मी आत जातच त्यांच्या पाय पडले..... 'काय आजोबा कसे आहात..! मी मस्त बेटा. तु कशी आहेस..? मी पण एकदम मस्त. आजी कुठे आहेत दिसल्या नाही. "अग ती आत आहे. आपल्याकडे ज्या कामासाठी येतात ना त्यांच्याकडुन तुझ्यासाठी छान बेत बनवून घेत आहे." " वाह..! म्हणजे आज माझी मज्जा आहे वाटत." मी आजोबांना टाळी देत म्हणाले. आम्ही तिघे हॉलमध्ये आलो. ""अग ऐकतेस का अरुणा बघ कोण आलय." आजी किचनमधून बाहेर आल्या तस मी त्यांना जाऊन मिठी मारली. "आजी कशा आहात तुम्ही..?" "बाळा मी छान..., तु कशी आहेस...?...." "मी पण छान आहे. आजी हे घ्या.." मी माझ्या हातातली डब्याची पिशवी पुढे करत म्हटले.

अरे...!! बाळा हे काय..?? आजी मी स्वतःच्या हाताने खोबऱ्याच्या वड्या केल्यात तुमच्यासाठी. हे ऐकताच निशांत धावत आजीकडे आला. काय 'खोबऱ्याच्या वड्या.' माझ्या आवडत्या आहेत. मला खूप आवडतात.. आणि त्याने टिफिन उघडून खायला सुरुवात सुद्धा केली. "वाह...!! काय सुंदर झाल्यात. आईंना सांग सॉलिड झाल्यात म्हणुन..." "थँक्स हा निशांत.!!, पण या मी केल्या आहेत. आणि त्याच्या हातातुन टिफिन आपल्या हाताने खेचुन तो आजी आणि आजोबांच्या समोर धरला. त्यांनी ही एक-एक वडी घेतली. "खरचं बाळा मस्त झालीये. छान चव आहे तुझ्या हाताला. ज्याच्या घरी जाशील त्याला नेहमी सुखात ठेवशील बघ.. आजी. अहो जास्त खाऊ नका डायबिटीस आहे तुम्हाला..." यावर मी आणि निशांत हसलो, पण आजोबा मात्र रुसले.

मग मी माझा मोर्च्या आजोबांकडे वळवला. "आजोबा गोळ्या घेतल्या का.?? त्यांनीही एखाद्या लहान मुलांसारखी मान हलवुन होकार दिला. "चला मग आता मला झाडं लावायला शिकवा." .... मी आणि आजोबा लगेच गार्डन च्या दिशेने निघालो. "बघ बाळा तु येणार म्हणून मी नवीन नवीन झालं घेऊन ठेवलीत."


माझ्या समोर छोट्या छोट्या प्लाटिकच्या काळ्या पिशवीत विविध रंगाची आणि जातीची फुलांची रोप होती. "बाळा तु तुझं पूर्ण नाव नाही सांगितलंस.." मी जीभ चावतच बोलु लागले... "मी प्रांजल प्रसाद प्रधान." "अच्छा..! आणि तुझे बाबा कुठे कामाला आहेत....??" .....
"माझे बाबा एका एमएनसी कंपनीत सिनिअर मॅनेजर च्या पोस्ट ला आहेत." "वाह...!! छान छान... आणि आई." "आई आधी जॉब करायची, पण आता घरीच असते."

" मग तुला कशी आवड झाडांची...??" मला ही आवड माझ्या आजोबांनी लावली. "माधव प्रधान." "आजोबांना कोकण खुप आवडायचं म्हणून त्यांनी तिकडे जागा घेतली होती. मग मी लहान आणि त्यांची एकुलती एक नात. त्यामुळे मी जेव्हा गावी जायचे तेव्हा ते मला झाडं लावायला शिकवायचे. माझे इवलेसे हात त्या मातीत घातलेले आजोबांना खुप आवडायचे. ते निसर्ग प्रेमी होते आणि त्याच्या सोबत मला ही यासर्वांची आवड लहानणापासून लागली......" "काय बोललीस तु...?? माधव प्रधान.. तुझे आजोबा..!!."

त्यांनी आजीला हाक मारून बोलवून घेतलं. सोबत निशांत ही बाहेर आला. "काय ओ काय झालं असे का ओरडत आहात..?" आजी बाहेर येत बोलल्या. "अग अरुणा.. आपल्या जवळ कोण आलाय म्हाहित आहे का..? ही माधुची नात. या वाक्यावर मी आणि निशांत एकमेकांकडे बघत उभे राहिलो.

त्यांनी आपले मातीमधले हात धुतले आणि आत निघून गेले. बाहेर आले तेव्हा त्यांच्या हातात एक अल्बम होता. त्यांनी मला जवळ बोलावले आणि त्या अल्बम मधला एका फोटोवर बोट ठेवून विचारल......"हेच का तुझे आजोबा..???"

मी आनंदाने होकार दिला. "हो हेच आहेत माझे आजोबा."
थोडा वेळ शांततेत गेला आणि आजोबांनी सांगायला सुरुवात केली. "बाळा., तुझे आजोबा आणि मी बालपणाचे मित्र. तुझा आजा वेडा होता निसर्गासाठी. म्हणुन माझ्याच ओळखीत त्याने कोकणात एक जमीन विकत घेतली. पण त्या माणसाने ती जमीन त्याला विकली खरी पण, पेपर्स खोटे बणवून दिले. त्यामुळे या जमिनीसाठी त्याने स्वतःच सगळं गहाण ठेवलं.अगदी स्वतःच राहत घर ही."

"त्यावेळी तुझे वडील म्हणजे प्रसाद कॉलेजमध्ये होता. ही केस मीच हँडल केली आणि तुझ्या आजोबांना ती जमीन मिळवून दिली. पुढे जाऊन प्रसाद ने खूप मेहनत घेऊन तुमचं घर परत मिळवलं. त्याच ही त्याच्या बापावर खुप जीव असल्याने त्याने कधीच कोणती तक्रार नाही केली. पुढे आम्ही काही काळासाठी पुण्यात गेलो आणि तिथुन आता परत या बंगल्यात. पण देवाने बघ आपली कशी भेट घालवून दिली." हे बोलताना आजोबांच्या डोळ्यायूं नकळत अश्रु वाहू लागले.

मग मी पुढे होत ते पुसले आणि त्यांना मिठी मारली. "बाळा काय करतो आता माधु.????" आजोबा... आता आजोबा नाही राहिले. मागच्या वर्षीच ते हे जग सोडून गेले. आपल्या कोकणातील घरात. आणि मी देखील रडु लागले. त्यांनाही वाईट वाटलं. काही वेळ शांतता पसरली.

ती शांतता भंग करत आजोबाचं बोलु लागले. 'बाळा तुला म्हाहित आहे का आम्ही ठरवल होत एकदा. जर मला नातु झाला आणि त्याला नात तर त्यांचं लग्न करून देऊ.' आणि जोरजोरात हसु लागले. हे ऐकताच मी निशांतकडे पाहिले. त्याने ही आपले डोळे मोठे करत माझ्याकडे पाहिजे. काही वेळ आम्ही एकमेकांना बघत राहिलो. आजोबा परत हसायला लागले तसे आम्ही ही हसु लागलो... "पण आता कोण कुठे सगळं पाळत. काही बोला.., पण एकदा त्याला भेटायला मिळालं असत तर खुप बर वाटलं असत बघ पोरी.." त्यांनी परत आपले डोळे पुसले.


"चल आपण आपलं काम करूया. आता तर तू हक्काने यायच इकडे मला भेटायला. माझी पण नात आहेस तू आणि हो प्रसाद आणि सूनबाईला पण घेऊन ये हा. निदान मी डोळे बंद करण्याआधी त्यांना बघेन." "आजोबा....! तुम्ही काही ही बोलत हा. अजून तुम्हाला खूप जगायचं आहे. मला हे सगळं शिकवायचं आहे. कळल ना...."

आमच्या गप्पा काही संपत नव्हत्या. माझी आणि आजोबांची अजुन छान गट्टी जमली होती. थोड्या वेळात आजी आल्या आणि आम्हाला जेवायला घेऊन गेल्या. छान नॉनव्हेजचा बेड होता. डायनिंग वर ही आमच्या गप्पा चालूच होत्या. हे सगळं निशांत फक्त ऐकत होता. बोलता-बोलता माझी आणि त्याची नजरा नजर झाली आणि माझ्या पोटात असंख्य फुलपाखरे उडावीत अस वाटलं. मी लगेच माझी नजर दुसरीकडे फिरवली. जेवणानंतर आजोबा जरा आराम करायला गेले.

"येऊ का आत..??" निशांत एकटाच गॅलरी मध्ये उभा होता. त्याने मानेनेच होकार दिला. "काय करतो आहेस.???..." "काही नाही.., समोर बघ छान वाटतंय ना.??!" मी समोर पाहिलं. समोर असंख्य डोंगररांगा होत्या आणि त्यांच्या समोर एक नदीच विशाल पात्र. मी ते मंत्रमुग्ध होऊन बघत राहिले.
"थँक्स.!!" मी निशांतकडे पाहिलं. मला बोललास का तु काही.

"हो.. थँक्स." मी आश्चर्याने त्याच्याकडे बघत बोलले...,,"का..? मला कशाबद्दल...???" 'आज तु आलीस, आजोबा आज खूप खुश आहेत. आज ते एवढे खुश आहेत जेवढे ते आधी होते. खर तर त्यांच्या म्हणजे माझ्या आई- बाबांच्या मृत्यू नंतर ते खूप शांत आणि आजारी राहू लागले. त्यांना मी त्यानंतर कधी हसतानाच बघितलच नाही. पण आज तुझ्यामुळे मला माझे जुने आजोबा परत भेटले. त्यामुळे थँक्स." आणि नकळत निशांतने मला मिठी मारली. काही वेळ मला कळलच नाही की काय होतंय. पण नंतर कळलं की निशांत रडत होता. हो तो रडत होता.

"हेय निशांत काय झालं...?? का रडत आहेस...?? इकडे बघ माझ्याकडे.. काय झालं..? आई- बाबांची आठवण येते आहे का ??".... त्याने मानेनेच हो म्हटलं. "खर तर आई-बाबा गेले आणि मी शांत झालो. माझे आजोबा माझ्याशी खेळायचे आजी काळजी घ्यायची. पण नंतर ते आजारी राहू लागल्याने मला वेळ देऊ शकले नाही.

मी एकटा राहू लावलो. एकट्या पणाने माझा राग वाढला आणि त्या नंतर मला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा राग येऊ लागला. मी सर्वांपासून दुरावलो. तासनतास मी माझ्या रूममध्ये घालवायचो "एकटा." पुढे खुप मित्र मिळाले पण, एकटेपणा काही कमी झाला नाही.

मग सर्वांसोबत असताना हसायचं, मज्जा करायचो पण एकांतात मात्र राडायचो. कधी कोणाला घरी आणावस वाटलंच नाही... पण तु भेटलीस..... म्हाहित नाही पण तुझ्या बाबतीत अस का करावस वाटलं नाही. तु त्या दिवशी मला वडा-सांबर वरून ओरडलीस. त्या नंतर लायब्ररीत आपलं भांडण आणि शेवटी डान्स वरून. हे सगळं एक योगायोग होता, पण एक छान मैत्रीण मला भेटली.

प्रांजल माझी अशीच मैत्रीण बनून राहशील ना आयुष्यभर....?.त्याने माझ्या डोळ्यात बघून मला विचारले.. मी त्याच्या डोक्यात टपली मारत होकार दिला. आणि अजुन एक सांगायचं होत.., मी त्याच्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिलं..."त्या खोबऱ्याच्या वड्या..." त्याने एक सुस्कारा सोडत माझ्याकडे पाहिलं.. "एकदम बेकार झालेल्या... मी खोट बोललो." हे बोलून निशांत पळाला मी देखील त्याच्या मागे धावत गेले. तो खाली आला आणि मी त्याच्या मागे. आम्ही गार्डनमध्ये एकमेकांच्या मागे लागून मस्ती करत होतो. हे सगळं आजी- आजोबा त्यांच्या रूममधून बघत होते.

दमुन आम्ही खालीच बसलो. मी पाणी पिण्यासाठी किचनमध्ये गेले, तर आजी चहा करत होत्या. "आजी मी करू का चहा...???" "जमेल का बाळा तुला..?" " खर तर नाही, पण तुम्ही शिकवा....!!" त्या सांगत होत्या आणि मी बनवत होते. ट्रे मध्ये कप घेऊन मी बाहेर आले. आजी बिस्कीट घेऊन आल्या.

निशांत आणि आजोबा आज खूप दिवसांनी चेस खेळत होते. मग सर्वांचा चहा झाला. गेम चालूच होता आणि त्यात नेहमी सारखा निशांत हरला. पण हरून देखील तो आज खुप खुश होता. छान गप्पा मारल्यावर मी घरी जाण्यासाठी निघाले. आजचा दिवस खूपच छान गेला होता. कधी ही न विसरता येण्यासारखा. त्या आठवणी मनात भरून मी परतीच्या प्रवासाला लागले. सोबत निशांत होताच.

"ए हनी-बी.. थँक्स. उद्या कॉलेजमध्ये लवकर ये तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे." बोलून निशांत निघून गेला. त्याच्या या वाक्यावर माझ्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल आली. मी घरी परतले. आज मला बाबांना खूप काही सांगायचं होत.
फ्रेश होऊन मी बाबांसोबत हॉलमध्ये बसले.

"बाबा आपल्या आजोबांचे कोणी "गोपाळ चिटणीस" म्हणून मित्र होते का..???", हे नाव ऐकताच बाबांनी टिव्ही बंद केला आणि आश्चर्याने मला बघितले. " परी..., मधेच तुला त्यांचं नाव कस आठवलं..? तु तर तुझ्या एक मित्राच्या घरी गेलेलीस ना.." हो बाबा.. तुम्ही सांगा ना..? कोणी होते का..?"

"अग कोणी होते का काय..? आणि फक्त मित्रच नाही तर माझे देखील बाबांचं होते अस म्हण. बाळा ते होते म्हणून आपल्याला कोकणातील जमीन मिळाली. त्यांनी आपल्याला खूप मदत केलीये. मला शिक्षणात ही त्यांची खूप मदत झाली. पण माझ्या करिअरमुळे त्यांना भेटता नाही आला. आणि ते देखील पुण्यात निघून गेले. त्यांचा मुलगा आणि मी एकाच वर्गात होतो. त्याची आणि माझी खुप छान मैत्री होती. हे सगळं बोलून बाबांनी आपले डोळे पुसले. "पण परी हे सगळं मधेच का विचारल बाळा तु..???"

"बाबा निशांत चिटणीस म्हणजेच तुमच्या मित्राचा मुलगा आणि गोपाळ चिटणीसांचा नातु आहे." मी बाबांकडे बघून त्यांना सांगितले.... "काय..???" ते अवाक होऊन ऐकत होते. "बाळा हे खरं बोलतेस तु.???" "हो बाबा मी का खोटं बोलु..?" मी आज गेले ना तेव्हा त्यांनीच सगळं सांगितलं मला. त्यांनी तुम्हाला आणि आईला देखील बोलावल आहे. "परी बाळा आपण नक्की जाऊया. एक काम कर निशांतचा नंबर मला दे आणि तर तू आता त्याला कॉल कर. मला त्यांच्याशी बोलायच आहे." बाबा तर आता अगदी लहानमुला सारखे वागत होते.

मी निशांत ला कॉल केला... "हॅलो निशांत... मी बोलतेय....." हा बोल ना ग तुझा नंबर सेव्ह आहे. काय झालं सगळं ठीक आहेस ना..???".... " अरे तु पोहोचलास का घरी.??? हो जस्ट पोहोचलो..? का काय झालं .? तु नीट बोलशील का.?

अरे आजोबांना फोन दे जरा बोलायच आहे. बर देतो. त्याने तिकडे आजोबांना फोन दिला आणि मी इकडे बाबांना. "हा बाळा बोल, आजोबा बोलतोय....." "बाबा मी...मी प्रसाद बोलतोय. बाबा कसे आहात. आई कुठे आहेत." "अरे प्रसाद...! मी उत्तम.. तु कसा आहेस. आणि माझी सुनबाई कशी आहे." फोन वर दोघेही रडत होते. बाबा पुढच्या रविवारीच मी तुम्हाला भेटायला येतो. आणि सुनबाईला ही घेऊन येतो हा. छान गप्पा मारून त्यांनी फोन ठेवला. बाबांच्या डोळ्यात अश्रू होते पण ते आनंदाचे. "परी बाळा तु आज मला...." ते काही बोलूच शकले नाही.. त्यांनी मला जवळ घेत मिठी मारून रडु लागले. आईच्या ही डोळ्यात अश्रु होते. मग मी त्यांचे डोळे पुसले आणि आम्ही जेवायला बसलो.

सगळं आवरून मी माझ्या रूममध्ये गेले. आजचा दिवस खुप सुंदर गेला होता. आनंदाने मी बेडवर झोपुन चक्क हसत होते. मला मधेच आठवलं की, उद्या माझ्यासाठी काही तरी सएप्राईज आहे. हे आठवून माझ्या चेहऱ्यावर छान कळी खुलली.. पण खूप थकवा आल्याने लगेच निद्रेच्या स्वाधीन झाले. उद्या काय असेल हे या विचाराने.....


to be continued.......

(कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कथेचा भाग कसा वाटला हे सांगा.)


स्टेय ट्युन अँड हॅप्पी रीडिंग गाईज..