Julale premache naate - 8 books and stories free download online pdf in Marathi

जुळले प्रेमाचे नाते - भाग-८

सगळे आईस्क्रीम संपवून परत हॉलमध्ये येऊन बसलो.. "आजोबा गोळ्या घेतल्या का तुम्ही....?" मी त्यांना गोळ्यांची आठवन करून देताच ते रूममधे गेले. मी आणि निशांतने सर्वांसाठी हॉलमध्येच बसण्यासाठी छान अशी अरेंजमेंट केली. मग आम्ही सगळे त्यावर बसलो...


बाबांनी मला सगळ्यांसाठी आणलेली गिफ्ट द्यायला सांगितली.. मी एक बॉक्स आजोबांच्या समोर धरला... "आजोबा हे घ्या.. तुमच्यासाठी... आणि दुसरा बॉक्स आजीच्या समोर.. आणि हे आजी तुम्हाला..." "बाळा काय आहे आम्ही काय लहान आहोत का गिफ्ट्स द्यायला..."... आजोबा गिफ्ट्स ही आपल्या जवळच्या व्येक्तिंना द्यायची असतात.. ज्यांना आपण आपलं मानतो..सो घ्या आता."


निशांतच्या समोर ही एक बॉक्स धरला... "हे तुझ्यासाठी..."
त्याने ही एक स्माईल देत घेतलं.

"मग आजोबा आवडला की नाही कुर्ता...?" "हो बाळा मस्त आहे हा मला आवडला."
आणि आजी तुम्हाला आवडली की नाही साडी...?" आईने आनंदाने विचारल.... "हो ग सुनबाई आवडली हा... छान आहे रंग." निशांतने हे बॉक्स उघडला त्याला ही दोन्ही शर्ट आवडली.... "थँक्स बाबा.. मस्त आहेत दोन्ही शर्ट्स"
"परीने सगळ्यांसाठी चॉईस केले आहेत कलर." बाबांनी पुढे होत म्हटलं... सर्वाना आवडल हे बघून मला मात्र छान वाटलं.


चला मग कोणता खेळ खेळायचा... "आपण पत्ते खेळूया." निशांतने सुचवलं. मग काय सर्वानी माना डोलावल्या. कॅट मधून निशांतनेच पत्ते सर्वांना वाटले आणि आम्ही गाढवपीसी हा खेळ चालू केला. "ज्यांना म्हाहित नाही त्यांच्यासाठी सांगतो.. गेम एकदम सोपा आहे.. मी सर्वांना पाच पाच पत्ते वाटणार. आणि राहिलेल्या पत्त्यांतून एक पत्ता न बघता काढून ठेवणार.. तो पत्ता हुकूमाचा असेल. मग सर्वानी समोर असलेल्या हुकुमा वरून पत्ता टाकायचा.. जर नसेल तो पत्ता तर समोर ठेवलेल्या जास्तीच्या पत्त्यांतून तो हुकूमचा पत्या मधला एक येईपर्यंत पिसत राहायचं. त्यानंतर सर्वानी टाकायचे ज्याने मोठा पत्ता टाकला त्याचा हात होईल आणि पुढचा गेम त्याच्यापासून सुरू होईल.


अस करत आपल्या जवळील सगळे पत्ते आपण संपवायचे आहेत.. ज्यांच्याकडे शेवटी जेवढे पत्ते शिल्लक राहतील तो या गेमचा आणि त्याच्याकडे असलेल्या एकूण पत्त्यांच्या पायाचा गाढव असेल..." एवढं सगळं त्याने सर्वांना समजावलं. चला सुरू करूया... खुप मज्जा येत होती. पहिल्या वेळेला निशांतच पाच पायांचा गाढव बनला.. आम्ही सगळे हसत होतो आणि तो देखील. मग मी बनले तीन पायांचा त्यावर ही सगळे हसत होतो...


त्यानंतर दुसरा पत्त्यांचा खेळ झाला. शेवटी सगळे कंटाळले म्हणून आजोबांनी दुसर काही खेळु सुचवलं... "चला आता गाण्यांच्या भेंड्या खेळुया.." मग काय दोन ग्रुप झाले... मी, आजोबा आणि बाबा... तर निशांत, आजी आणि आई असे आमचे दोन ग्रुप आम्ही केले.


चालु झालं आणि पहिला डाव आमच्यावर आला... आम्हाला 'म' वरून गाणं बोलायच होत मग काय... आजोबांनी गायला सुरुवात केली...

मनाच्या धुंदीत लहरीत ये ना...,
सखे ग साजणी, ये ना...,
जराशी सोडून जनरीत ये ना..,
सखे ग साजणी, ये ना

गाणं संपताच आम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.... आता समोरच्या ग्रुपला म्हणजे निशांतच्या ग्रुपला 'न' वरून गाणं बोलायच होत.....

निशांतने गाणं सुरू केलं.....,

न जाने मेरे दिल को क्या हो गया
अभी तो यहीं था अभी खो गया

हो गया है तुझको तो प्यार सजना
लाख कर ले तू इनकार सजना
दिलदार सजना, है ये प्यार सजना

हे गाणं बोलताना निशांतच लक्ष फक्त माझ्याचकडे होत... मी देखील त्याला बघुन का कोण जाणे., पण थोडी लाजतच होते... आता आमच्या वर 'न' आला होता...मग मीच गाणं
म्हणायला सुरू केल....

नाही कळले कधी जीव वेडावला
ओळखू लागलो तू मला मी तुला
नाही कळले कधी.....
गोड हुरहूर ही श्वास गंधावला
ओळखू लागलो,तू मला मी तुला
नाही कळले कधी
तू मला, मी तुला, गुणगुणू लागलो
पांघरू लागलो, सावरू लागलो......

या गाण्यात मी त्याच्याकडे बघुन बोलत होती... त्याच्या डोळ्यातले भाव काही वेगळच सांगत होते अस एक क्षण मलाच वाटून गेलं... पण गाण्यामुळे असेल म्हणून मी देखील काही बोलले नाही... माझ्या गाण्यानंतर अजून थोडी गाणी झाली... मराठी, हिंदी... लता दिदींची..., रफिक सरांची..., माझ्या आवडत्या स्वप्नील बांदोडकरची...आणि घडाळ्यात बाराचा टोल वाजला.. तसे आजोबांनी झोपायला जायला सांगितलं.

"निशांत बाळा त्यांना त्यांची रूम दाखव बघु..." मग आजी-आजोबा ही वर गेले. सोबत आम्ही देखील. वरच्या बाजुच्या शेवटच्या रूममधे आम्हाला आज झोपायचं होत. मग मी आता जाऊन जरा फ्रेश झाले आणि झोपायच म्हणुन बाहेर येऊन सर्वाना गुड नाईट केलं. विश करून मी झोपली... खर तर प्रचंड झोप येत होती... आणि मी झोपले ही.. अचानक रात्री जाग आली... मोबाईल मध्ये पाहिलं तर फक्त अर्धा तास झाला होता. परत झोपायचा प्रयत्न करू लागले.... पण झोप काही येत नव्हती.

बाजुला आई.., तर समोरच्या सोफ्यावर बाबा मस्त झोपले होते. मग कंटाळून मीच बेडवर कूस बदलत राहिले. पण झोप काही केल्या येत नव्हती.. पाणी प्यातला बाहेर आले. आधी भीती वाटली.., पण नंतर आत बसुन काय करणार म्हणून जरा पाणी पिऊन येण्यासाठी किचनमध्ये जायला निघाले.

सिड्या उतरताना सारख मला कोणी तरी मला बघत आहे असा भास झाला. पण मी दुर्लक्ष करत निघाले. किचनमध्ये पोहोचून पाणी पीलं.. तेव्हा कुठे बर वाटल. वर जायला निघाले पायऱ्या चढुन वर आले. निशांतच्या रूमचा दरवाजा उघड वाटला म्हणुन बघायला जात होते की, त्या मिठ्ठ काळोखात कोणी तरी माझ्या हाताला खेचलं....

कोणी तरी त्या अंधारात माझा हात खेचल्याने मी अर्धमेली झाली होती... पण तो निशांत होता... "निशांत तु...?? पागल आहेस का...??!.... का केलंस अस....??... आता जीव गेला असता... या वाक्याला त्याने माझ्या तोंडावर स्वतःचा हात धरला.... "ए हनी-बी...मी असताना तुझ्या केसाला ही धक्का लागणार नाही... मरण तर खुपच दूर आहे.." त्या क्षणाला तो असा बोलला आणि माझ्या पोटात गोळाच आला.
का ते नाही म्हाहित.. पण बर वाटल.

हे असे डायलॉग फक्त मी पिक्चरमध्येच ऐकले होते. पण आज कोणी तरी माझ्यासाठी बोलत होते... ते ही खऱ्या आयुष्यात... "मग तु मला घाबरवलस त्याच काय...??" मी त्याच्याकडे पाहिलं...त्याने ही लगेच स्वतःचे कान धरत माफी मागितली... मग मी देखील लगेच माफ केल..... "तु काय करतो आहेस एवढ्या रात्री...??" "मला झोप येत नव्हती म्हणून खाली जात होतो.., तर तू दिसलीस म्हणून गंमत केली..." सॉरी... त्याने परत एकदा माफी मागितली.

"कॉफी पिणार का...??".... "काय बोललास..."... मी माझे डोळे त्या अंधारात ही मोठे केले... "हा.., जे तु ऐकलस ते..." चल आज तुला माझ्याकडून कॉफी, म्हणत आम्ही किचनमध्ये गेलो.... "अरे वाह...!! हे पण जमत का..??"
"मग काय.., जमत हा... जेवण ही येत.., हा आता परफेक्ट नाही.. पण खाऊ शकतेस एवढं तर नक्कीच जमत.." तो कॉफी बनवता बनवता माझ्याकडे बघत बोलला.

त्या रात्रीच्या वातावरणामध्ये छान अशी कॉफी... मस्त माहोल होता. त्या फेसाळलेल्या कॉफीचा सुगंध दळवळत होता.. मग आम्ही कॉफीचे मग घेऊन टेरेसवर गेलो...
पहिला घोट मी घेतला आणि.. निशांतकडे पाहिलं....."काय झालं...?" चांगकी नाही का झाली..?? साखर कमी पडली का..??? बोल ना.. आता फक्त बघतच राहणार आहेस का...?
तो एकटाच बडबडत होता..... मी परत एक घोट घेतला... "काय कमाल झालीये कॉफी...." एकदम सॉलिड... मला ही शिकव हा नक्की...." त्याने फक्त मानेनेच होकार दिला.


कॉफी पित-पित आमच्या गप्पा चालू होत्या.... "हनी-बी...थँक्स.." "कशा बद्दल..., ही कॉफी तु केली आहेस मीच थँक्स म्हटलं पाहिजे..." मी हसत त्याच्याकडे पाहिलं.


तो बोलु लागला... "तुला म्हाहित आहे.. आपल्या आयुष्यात माणस येतात आणि जातात... पण एकदाच एक वेक्ती येते आणि आपण बदलतो... ते आपल्याला आपलसं करून घेतात.. आपल्याला आपल्या वाईट प्रसंगात समजून घेतात... तसच काही माझ ही झालय.. मी आयुष्यात खुपदा रडत असाच झोपलो आहे... कधीच कोणी मला माझं सापडलाच नाही जे माझे अश्रु पुसेल.... पण आज तु आलीस. माझे अश्रु पुसले.... अर्थवट बोलून तो उठून गेला...


समोर उभा राहिला... त्या गच्चीवर आकाशातील चंद्राचा हलका प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडत होता. मी पण त्याच्या बाजूला जाऊन उभी राहिली.... "काय रे सारख थँक्स असत तुझं...." आपल्या माणसांना सारख थँक्स बोलु नये... कळलं का...!"

"निशांत तुला म्हाहित आहे तु या चंद्राच्या प्रकाशात किती गोड दिसतो आहेस ते...." त्याने लगेच माझ्याकडे पाहिलं... मी त्याला टक लावुन बघत होते... त्याच्या लगेच बघण्याने मी मात्र चांगलीच गोंधळून गेले.... "म्हणजे... मला बोलायच आहे की.., तुझ्या नावाचा अर्थ तसाच काहीसा आहे असं बोलायच होत... मी आता तोंडात येईल ते फेकत होते.... पण खरचं तो खुप गोड दिसत होता...

"काय आहे माझ्या नावाचा अर्थ...." तो जरा माझ्या बाजुला सरकत विचारता झाला... मी देखील जरा सरकतच हसले....
"तुला नाही का म्हाहित... निशांत म्हणजे..., रात्रीचा शेवट.... निशांत म्हणजे... सकाळचा पहिला प्रहर... निशांत म्हणजे त्या आकाशातील शांत चंद्र.... आता तु जेव्हा उभा होतास ना तेव्हा ही त्या चंद्रासारखा वाटत होतास "शांत".... मी त्याच्याकडे बघत माझं वाक्य पूर्ण केलं.

तो कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये, लायब्ररीमध्ये भेटलेला निशांत आणि आजचा सर्वांच्या आवडी जपणारा, भावुक निशांत वेगळा आहे... हाच छान आहे."..... हे वाक्य मी त्याच्या डोळ्यात बघून बोलले... त्याला ही छान वाटलं. कारण त्याच्या फेसवर एक मोठी स्माईल होती...

"अरे वाह..! मला नव्हतं म्हाहित माझ्या नावाचा एवढा छान अर्थ असेल तो..." आता थँक्स नाही बोलणार... यावर मात्र मला चांगलंच हसु आला आणि त्याला ही.... "पण एक गोष्ट सांगू का..., ते ओशन ब्लू कलरच शर्ट मला खुप आवडल.. मला म्हाहित आहे ते शर्ट तुलाही खुप आवडल आहे ना... ते मी माझ्या सर्वांत आवडत्या दिवशी घालेन..."


"कोणत्या हा... मला म्हाहित आहे कोणत्या तरी मुलीला प्रपोज करायला जाणार तेव्हाच घालशील ना..." मी डोळा मारतच विचारले... "आता तुलाच सगळं वाटत तर मी कशाला काय सांगू ना...!" यावर मी गप्प झाले.. आणि तो मात्र हसला मग मी पण हसले.


मग परत गप्पा झाल्या... "बाय द वे एक विचारू का..." हो विचार ना परवानगी कशाला...?"
नाही ते खाजगी आहे ना..." त्याने स्वतःची जीभ चावतच म्हटलं... "बर विचार..."
"तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे का...?" मी समोर बघत फक्त नाही म्हटलं... "का..?" "मला आवडेल असा मिळालाच नाही कधी... ज्याच्या एका नजरेने माझ्या पोटात फुलपाखरे उडावीत.." तिच्याकडे बघत मी त्याला विचारल "तुझ्या किती गर्लफ्रिन्डस् झाल्या ते सांग...."

"एक ही नाही...."..... मैत्रिणी आहेत. पण ती अजून काही भेटली नाही. तीच फक्त नाव जरी ऐकल तरी माझ्या चेहऱ्यावर हसु यावं अशी कोणी भेटलीच नाही.. जी माझे अश्रु स्वतःच्या हाताने पुसेल... माझ्या दुःखात माझ्या जवळ असेल अशी भेटली नव्हती... पण वाटत आता भेटेल." त्याच्या या वाक्याला मी त्याच्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिलं.... "अग भेटेल ना कधी तरी..." नाही तर तू शोधुन देशील ना मला..." त्याने एक डोळा मारत म्हटलं...

"हो.., हर्षल सोबत देऊ का सेटिंग लावुन...." "नाही ग.., ती नको... मला नाही आवडत ती.. म्हणजे फ्रिएन्ड म्हणून ठीक आहे.. गर्लफ्रिएन्ड नको.." त्याने तर आता चक्क हात जोडले माझ्यासमोर... मला तर हसूच आल.., सोबत दडपण ही.. कारण हर्षु निशांतवर किती प्रेम करते हे मला म्हाहित होत. "चला मॅडम झोपुया... दीड वाजतोय..."

आम्ही खाली आलो... मी त्यांना परत गुड नाईट विश केलं... "हनी-बी"
"हा.., बोल ना..." "पण तिची मैत्रीण आवडेल मला...." एवढंच बोलून तो स्वतःच्या रूममध्ये निघून गेला... एक क्षण मला ही कळलं नाही... मी आत जाऊन बेडवर पडले...
थोडा विचार केला पण कधी झोप लागली हे ही कळलं नाही....

सकाळी आईने मला उठवलं.. आम्ही छान फ्रेश होत खाली आलो.. आज शांता काकु म्हणजे त्यांच्याकडे काम करणाऱ्या आल्या होता.. त्यांनी छान असा इडली, मेदु- वड्यांचा बेत केला होता नाश्त्याला... काही वेळाने निशांत ही आला.. त्याचे ते भिजलेले केस मला खुप आवडायचे... आताही तो तेच बाजूला करत होता... त्याची अचानक नजर माझ्यावर गेली आणि तो थांबला... त्याने मला डोळा मारला आणि चहा घेतला.... "हो.., त्याने मलाच डोळा मारला." त्याच्या त्या कृतीने मी मात्र चांगलीच उडाली... माझ्या पोटात असंख्य फुलपाखरे एकदम उडल्यासारखी झाली... चहा पीत तो माझ्याकडे बघत होता.. मी मात्र माझी नजर दुसरीकडे वळवली...

मग छान बोलत आम्ही नाश्ता केला... दुपारी नॉनव्हेज चा बेत होता... जेवुन मी आणि आजोबा गार्डनमध्ये झाडं लावत बसलो... संध्याकाळचा चहा आम्हचा गार्डनमधेच झाला...

"चला बाबा आम्हाला निघायला हवं..." "निघालात तुम्ही..." कळलंच नाही वेळ कसा निघुन गेला तो..." प्रसाद बाळा प्राजुला आमच्याकडे पाठवत जा.. बघ घर कस छान वाटत ती आली की.." हो बाबा आता आमचं येन जाण होईलच आणि प्राजु देखील येत जाईल डोन्ट वरी... चला आता आम्ही निघतो."


मी आजी-आजोबांच्या पाया पडले... आम्ही बोलत असता निशांत निघून गेला होता... "आई मी आली हा निशांतला भेटुन.." मी वर गेले तर हा गॅलरीत उभा... "काय झालं...? आता काय आम्हाला बाय ही करणार नाहीस का...काल जरा बर बोलली तर तू तर आज लगेच खडूस सारखा वागू लागलास... मी त्याचा मुड ठीक व्हावा म्हणून मस्करी केली..

"ए हॅलो..., काय झालं. तोंड का पाडून आहेस..??"
"तुम्ही जात आहात ना.. सो वाईट वाटतंय.." तो समोर बघतच बोलला.. " ओ मिस्टर जात आहोत म्हणजे..., विसरलास का.., आम्ही काही गावी जात नाही आहोत. मुंबईत तर रहातो. आणि आपण एकाच कॉलेजमध्ये आहोत.. हे देखील विसरलास वाटत." "तस नाही.... पण.. मी मिस करेन तुला..." या वाक्यात खूप दुःख जाणवलं... मिस करायला मी काय पळुन जाते आहे का...?, उद्या भेटणारच आहेस कॉलेजमध्ये... मी त्याच्या डोक्यात टपली मारली..


"चल आता सेंटीपणा नको. खाली जाऊया नाही तर सगळे वर येतील.. उगाच गैरसमज होतील त्यांना.." "होऊ देत ना"
मग.." त्याने माझ्याकडे बघत एक स्माईल दिली...
कालपासून तु जरा जास्तच कोड्यात बोलतो आहेस जे मला काही कळत नाहीये...ते जाऊदे आता चल खाली." मी त्याचा हात धरतच त्याला खाली आणालं.. सगळे माझ्याकडे बघु लागले म्हणून मी लगेच त्याचा हात सोडला आणि जाऊन आजी- आजोबांना भेटली...

"चला मग येतो आम्ही आजी-आजोबा... तुम्ही काळीज घ्या
मी येईन परत भेटायला..." सगळ्यांचे निरोप घेत आम्ही गाडीत बसलो.. का म्हाहित नाही पण जाताना मला ही काही तरी राहिल्या सारख वाटत होतं.... मी गाडीत बसले. निशांतचा तर पूर्ण मुड ऑफ वाटत होता... मी त्याच्याकडे बघत एक स्माईल दिली त्याने ही दिली... पण त्यात तो गोडवा नव्हता.

बाबांनी गाडी स्टार्ट केली. मी सर्वाना बाय करत होते. आम्ही जाईपर्यंत मी मिरर मधून निशांतला आणि त्यांच्या बंगल्याला बघत होते.... तो दिसेनासे होईपर्यंत..

गाडी आता खूप पुढे आली होती... आता मी देखील त्याला मिस करू लागले... संध्याकाळचा सूर्य मावळतीला झुकला होता... चहू बाजुने त्याचा तांबडा-पिवळा रंग पसरला होता... आकाशातील पक्षी घराच्या ओढीने निघाले होते... हे सगळं बघत आम्ही आमच्या बिल्डिंगखाली पोहोचलो...


घरी पोहोचताच मी रूममध्ये गेले आणि निशांतला मॅसेज केला... त्याचा ही रिप्लाय लगेच आला जणू काही तो माझ्याच मॅसेजची वाट बघत असावा... मग फ्रेश होत थोडा राहिलेला अभ्यास संपवून मी आईला मदत केली.. रात्री जेवुन लवकरच बेडवर आडवी झाली.... डोक्यात कालच्या रात्रीचे सुखद आठवणी आठवत मला कधी झोप लागली हे मात्र मला ही कळलं नाही..... पण त्या शेवटच्या क्षणात मला फक्त आठवत होत ते एकच नाव ते म्हणजे.......... निशांत
रात्रीचा शांत चंद्र..

to be continued.....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED