Julale premache naate - 11 books and stories free download online pdf in Marathi

जुळले प्रेमाचे नाते - भाग-११

सकाळच्या अलार्मने मला जाग आली. मी देखील जास्त टाईमपास न करता उठून फ्रेश व्हायला गेले. छान तय्यार होत आवरून बाहेर आले. जास्त नाही साधा ब्लॅक टिशर्ट आणि खाली ब्लू जीन्स. थंडी म्हणून माझं आवडत मऊ मऊ पिंक स्वेटर. आई आज माझ्यासाठी लवकर उठली होती.. जाणार म्हणून तिचीच जास्त घाई चालू होती.. मी गप्प जाऊन डायनिंग टेबलावर बसले...


तोच निशांतचा कॉल आला.., तस आईने त्याला ही वर बोलावून घेतलं. बळे-बळेच त्याला नाश्ता करायला लावला सोबत मला ही. खाऊच्या पदार्थांची एक बॅग माझ्या बॅगेत टाकून दिली.. प्रवासात लागेल म्हणुन.. पण कोण खाणार होत ते तेलकट वैगेरे.. पण आई पुढे कोणाचं काय चालतं...


आज निशांत छान दिसत होता.. त्याची आर्मी स्टाईलची हुडी त्याला चांगलीच सुट होत होती.. सकाळच्या वातावरणात थंड वातावरण आणि सोबत निशांत.. तो क्षण मनाला आनंद देऊन जात होता.

बाहेर पाऊस नसला तरीही थंड वातावरण होत. मी घातलेल्या स्वेटर मधून ही थंडपणा मला जाणवत होता. पण डोक्यावर घातलेल्या कान टोपीमुळे जरा बर वाटलं... आज आम्ही बाईक नव्हतो घेऊन जाणार कारण आमचं सामान जास्त होत.. खर तर माझच जास्त होत.. मग आम्ही उबरची कॅब बुक करायचं ठरवलं. काही वेळाने कॅब खाली आल्याच निसगांतने सांगितलं.. आईचा निरोप घेऊन आम्ही खाली आलो..

कॅब येताच आम्ही खाली आलो. मी एसी चालू असतानाही खिडकी ओपन केली.. सवयीचा परिणाम... बाहेर थंड वार वाहत होत. त्यामुळे थंड हवेचा स्पर्श अंगाला बोचत ही होता. रस्त्यावर ही छान धुके पसरले होते. सकाळ असल्याने रस्त्यावर वाहनं ही कमीच त्यामुळे आम्ही सुसाट वेगाने निघालो. काही मिनिटात आम्ही कॉलेजच्या गेट जवळ पोहोचलो. कॅब मधून सामान काढून आम्ही राज आणि हर्षुची वाट बघत थबलो.. पण राज आणि हर्षु काही आले नव्हते.. त्यामुळे आम्ही जवळच्या टपरीवर जाऊन एक-एक कप चहा घेतला. खूप बरं वाटल त्या थंड वातावरणात.


काही वेळाने समोरून एक मोठी ब्लॅक गाडी आमच्या समोर येऊन थांबली. ती राजची होती. फ्रंट सीट वरून हर्षु उतरून बाहेर आली आणि मला येऊन बिलगली. राज ही आला आणि निशांतला ब्रो हग केली. मला हात मिळवत आम्ही गाडी जवळ गेलो. सामान नीट गाडीत ठेवुन आम्ही गाडीत बसलो.


गाडी राज चालवत होता. त्याच्या बाजुच्या सीटवर निशांत आणि बॅक साईडला मी आणि हर्षु बसलो होतो. गाडीमध्ये छान गाणी लावली होती. पण मी मात्र बाहेरच्या निसर्गामध्ये हरवले होते. बघता बघता मी स्वतःचा चेहरा समोर केला, तोच माझी आणि निशांतची समोर असलेल्या काचेमध्ये नजरा नजर झाली. काही क्षण आम्ही तसेच बघत होतो की राजने अचानक ब्रेक लावला. अरे..! काय झालं..??? मागून हर्षुने विचारल.

मला भूक लागली आहे चला समोरच्या हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करूया. त्याने वळून आमच्याकडे पाहिलं. "भाई तु पण ना...!" आम्ही बाहेर निघालो. समोरच एक हॉटेल होत. तिकडे जाऊन बसलो. मी छान गरमा गरम तिखट असा मिसळ-पाव मागवला. निशांतने ही सेम मागवलं. हर्षु ने गरम वडे.., तर राज ने इडली-वडा. सोबत चहा होताच. पोटपूजा झाल्यावर आम्ही परत रस्त्याला लागलो.

आता गाडी निशांत चालवत होता. म्हणून मी जाऊन पूढे बसले. यावर हर्षु चिडली.., पण निशांतच्या शब्दापूढे नसल्याने जाऊन मागे बसली. छान प्रवास चालू होता. काही वेळाने परत राज गाडी चालवू लागला, पण यावेळी मला काही मागे जाता आलं नाही. हर्षु ही लगेच खुश झाली.

मागे निशांत आणि हर्षु, तर पुढे मी नाही राज असे आम्ही बसलो होतो.. राज आणि माझ्या गप्पा चालू होत्या. तर मागे निशांत शांत झोपला होता. काही वेळाने मला ही झोप यायला लागली म्हणून मी हर्षुला पुढे बसायला सांगितले. खर तर तिला नव्हतं जायचं.., पण राज ने सांगितल्यामुळे ती पुढे येऊन बसली.

आता मागे मी आणि निशांत होतो. निशांत जागा झालेला. तर मी झोपा काढत होती. अचानक मी झोपेमध्ये निशांतच्या खांद्यावर सरकली. त्याला ही हे नवीन होत, पण माझ्या झोपलेल्या चेहऱ्याला बघत त्याने मला उठवलं नाही. कदाचित त्याही ते आवडले असावे. काही वेळ मी अशीच होते..., आता माझी मान आखडली गेल्याने मी काही ही विचार न करता निशांतच्या मांडीवर स्वतःचे डोके ठेवून झोपुन गेले. हे मात्र त्याच्यासाठी जास्तच होत..आता तो अवघडल्यासारखा बसला होता.. पण तरीही त्याने मला उठवले नाही. माझ्या झोपलेल्या चेहऱ्याकडे तो बघत राहिला.


पण हे सुख मात्र कोणाच्या तरी डोळ्यात खुपत होत. ते हर्षल आणि राज होते. पण ते देखील काही करू शकत नसल्याने गप्पच होते. काही वेळाने मला जाग आली तेव्हा मला कळलं की मी निशांतच्या मांडीवर स्वतःचे डोके ठेवून निवांत झोपले होते. स्वतःच्याच डोक्यावर हात मारत मी निशांतची माफी देखील मागितली. त्याने मात्र काही म्हटले नाही.. मला तर वाटलं त्याला राग आला असवा म्हणुन बोलत नाहीये.

परत राजने गाडी थांबवली. आम्ही रात्रीच्या जेवणासाठी थांबलो होतो. मी, हर्षु आणि निशांत पूढे निघून गेलो आणि एका टेबलावर जाऊन बसलो. मागून राज देखील आम्हाला जॉईन झाला. छान जेवण करून आम्ही परत गाडी जवळ जायला निघालो. राज खूप थकल्यामुळे मागे जाऊन झोपला सोबत हर्षु देखील. आता त्या रात्रीच्या शांततेत मी आणि निशांत गाडीमध्ये दोघेच जागे होतो. तो शांतपणे गाडी चालवत होता. आणि मी त्याला बघत होते.

"काही बोलायच असेल तर बोल....! अस बघत नको बसुस.." मी लगेच समोर पाहिलं. याला आता बाजूच ही दिसलं का..?? मी स्वतःशीच बडबडले.... "निशांत.., सॉरी.." 'का...?? कशा बद्दल सॉरी..??"... "ते मी तुझ्या मांडीवर झोपले.. सॉरी., अतीच झालं." इट्स ओके... चालत एवढं काय... . त्याने माझ्याकडे बघून एक स्माईल दिली. त्यानंतर माझी अखंड बडबड चालू होती आणि निशांत ती गप्पपणे ऐकत गाडी चालवत होता.

मधेच मी खिडकीची काच खाली केली.. बाहेर हलका पाऊस पडत होता... छान मातीचा सुगंध मनात भरत आम्ही सुसाट वाऱ्याच्या वेगाने निघालो होतो... गाडीमध्ये ही छान गाणं लागलं होतं...


भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा
बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला
ये ना जरा, तू ये ना जरा, चाहूल हलकी दे ना जरा
ये ना जरा, तू ये ना जरा, चाहूल हलकी दे ना


झिम्मड पाऊस, तू नको जाऊस, चुकार ओठ हे बोले
श्वासांत थरथर, सरीवरी सर, मन हे आतुर झाले
झिम्मड पाऊस, तू नको जाऊस, चुकार ओठ हे बोले
श्वासांत थरथर, सरीवरी सर, मन हे आतुर झाले
ये ना जरा, तू ये ना जरा, मिठीत हलके घे ना जरा
ये ना जरा, तू ये ना जरा, मिठीत हलके घे ना

भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा
बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला

गाण्याच्या प्रत्येक ओळीवर माझी आणि निशांतची नजरा नजर होत होती... ते गाणं जणु आम्हा दोघांच्या मनात नवीन भावना फुलवत होत..

आमचा प्रवास चालूच होता... आम्ही सगळे नवीन आठवणी गोळा करायला निघालो होतो... या सहलीमध्ये नक्कीच काही तरी नवीन घडणार होत..


to be continued.........

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED