Julale premache naate - 4 books and stories free download online pdf in Marathi

जुळले प्रेमाचे नाते - भाग-४

मी बोलताना माझ्या समोर बसलेल्या तिघींचे हावभाव टिपत होते. गंमत ही वाटत होती. बोलता-बोलता अभिच्या नवऱ्याचा कॉल आला म्हणून आम्ही स्टोरी थांबवली. "गर्ल्स मी येईपर्यंत चालू करू नका हा." आम्ही माना डोलावल्या. ती बेडरूममध्ये गेल्याने आम्ही तिघी गप्पा मारत बसलो.

"काय मग प्रिया कशी चालू आहे मॅरेज लाईफ...??" मी मुद्दाम तिला त्रास देण्याचा प्रयत्न करत होते. खर तर त्यांचं लव्ह विथ अर्रेंज मॅरेज.., पण लग्नानंतर सासुने चांगलेच रंग दाखवायला सुरुवात केले. मग मॅडम ही काही कमी नव्हत्या तिनेही नाशिकचा तडका दाखवला. असे हे दोघे सासु-सुनेचे चालूच असत म्हणून नवऱ्याने बदली करून घ्यायचा प्रयत्न ही केला. हे कळल्यावर आता कुठे दोघी शांत आहे. पण मध्ये-मध्ये चालूच असत.


"माझं सोड ग तु सांग...? कधी जाणार आहेस हनीमून ला.???..." "हो जायचं आहे ग. पण त्याच्या बीसीनेसमुळे कुठे जायचे म्हणजे टेंशन असत. हा एकतर स्वतःच्या कामामध्ये एवढा बिझी असतो की कधी कधी घरी देखील येत नाही...मीच वाट बघते आहे. बघू आता कधी जायचं ते.. तुम्ही कुठे गेलेलास हा....!! मी डोळा मारत प्रिया आणि वृंदाला विचारल.....!." आमची बडबड चालु असता अभि आली....."कोण कुठे जात आहे...??" "कोणी नाही ग.... ये बस," प्रियंकाने अभिला सोफ्याजवळ खेचलं. मी स्टोरी चालु केली....
हा तर झालं असं की त्या दिवशी त्याने मला मॅसेज करून बोलवून घेतलं..


घाईतच मी ऑडीमध्ये दाखल झालेले. निशांतचा मॅसेजच तसा होता. मी पोहोचले तर हा ऑडीमध्ये बसून मोबाईल वर गाणी ऐकत होता. "निशांत..., तु ठीक आहेस ना..??तु मॅरेज करून घाईमध्ये बोलावून घेतलंस.. काय झालं..??" "ये प्रांजल.., मला ना एक नवीन आयडिया सुचली आहे. त्यासाठीच तुला मॅसेज करून बोलवुन घेतलं. परत मी विसरलो तर म्हणून हे सर्व.." हे ऐकून तर मी माझ्या डोक्यावर हातचं मारून घेतला. त्याच्या जवळ बसून मी त्याला त्याची आयडिया विचारली..

"म्हणजे बघ आपण डायरेक्ट डान्स सुरू करतो ना त्यामध्ये आधी आपण त्यात ऑडिओ रेकॉर्ड करून तो लावायचे.... आपली कन्सेप्ट कळली पाहिजे ना लोकांना.. सुरुवातीला एक आणि त्यानंतर डान्सच्या मध्ये मध्ये ही एक दोन ऑडिओ, बस हेच सांगायच होत. त्याने एक स्माईल देत माझ्याकडे पाहिलं. मला देखील त्याची ही आयडिया आवडली. "पण निशांत.., आपण रेकॉर्ड करायच काय..??"
अग ते नंतर सांगतो, बस हे सांगून ठेवलं म्हणजे तुला काही आठवले तर तु देखील सांगू शकतेस. मग आम्ही आमच्या डान्सची प्रॅक्टिस करू लागलो.

प्रॅक्टिस संपवून आज एकत्र आम्ही आमच्या क्लाससाठी निघालो. त्याचा वर्ग वराच्या फ्लोरवर असल्याने तो बाय करतच वर गेला. मी देखील त्याला बाय करत माझ्या वर्गात जाऊन बसली. मी माझे काही नोट्स बनावत असता..., हर्षु माझ्या बाजुला येऊन बसली. "हेय ., कशी आहेस प्राजु..?" मी फक्त तिच्याकडे पाहिलं आणि हातातलं काम करत राहिले. "प्राजु यार...!, तु कालच्यासाठी भाई वर रागवु नकोस ना.. तो खुप चांगला आहे. आणि त्याने हे सगळं मस्ती मध्ये केलं. तुला काय वाटत ती मुलगी काही बिचारी आहे का.. तीच त्याच्या जवळ जात होती हवं तर तिला विचार..." आणि तिने सीमा ला बोलावले.


"सीमा इकडे ये ग जरा.." या सगळ्यात मला काही इंटरेस्ट नसल्याने मी मात्र माझं काम करत राहिले. सीमा आमच्या जवळ येत.. हर्षल ची माफी मागू लागली.. "हर्षल सॉरी कालसाठी... मला नव्हत म्हाहित तो तुझा भाऊ असेल.. मी मस्ती करायला गेले आणि त्याने मग माझ्यासोबत ही मस्तीच केली. त्याला माझ्याकडून सॉरी बोल हा प्लीज.." हे ऐकून मी माझे डोळेवर केले आणि सीमाकडे पाहिलं.


"सीमा तु खर बोलते आहेस. तु स्वतः त्याच्याकडे गेलेलीस..??" "हो प्रांजल.. मीच मस्ती करायला गेलेले. खर तर माझ्या ग्रुपमध्ये बेट लावली होती म्हणुन मी तस केलं. सॉरी माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला...." एवढं बोलून ती निघून गेली.


"बघितल प्राजु, माझ्या भाईची काहीच चूक नाहीये यात.."हर्षु माझ्याकडे बघुन बोलत होती. मी काही ही न बोलता माझं काम करत राहिले. लेक्चर्स संपवत आम्ही कॅन्टीनमध्ये गेलो. तिकडे निशांत आणि त्याचे काही फ्रिएन्ड एका टेबलवर बसुन गप्पा मारत होते. मला बघताच त्याने मला ही बोलावल. "हेय..,प्रांजल इकडे ये.." मग मी आणि हर्षु जाऊन बसलो. मॅडम तुमची पार्टी बाकी आहे ना... थांब मी घेऊन येतो. अस बोलून तो गेला. हर्षुने माझ्याकडे बघत आपली एक भुवई वर करत विचारल..?? कसली पार्टी प्राजु..?

"अरे ती डान्स पार्टनर होण्यासाठी मी त्याच्याकडे वडा-सांबरची पार्टी मागितली होती ग बस एवढंच." मग तिने ही जाऊन तेच आणलं. ते दोघेही काउंटर वर गेले असता मी माझं डोकं मोबाईलमध्ये घालून बसले होते. तोच समोर हर्षुचा भाऊ येऊन बसला. "हाय.., प्रांजल... मी माझं डोकं मोबाईल मधून बाहेर काढलं तर हा समोर बसला होता. मी लांबूनच हाय केलं आणि निशांतची वाट बघू लागले. तो काही बोलणार तितक्यातच निशांत माझ्यासाठी वडा-सांबर घेऊन आला. निशांतला बघुन मला खुप बर वाटल.. जसा की जीव सुटला.

हनी-बी.., हे घे तुझी पार्टी..... झाली हा पार्टी माझ्याकडून.....आज खाऊन घे. मी वडा- सांबर संपवलं तसा त्याने माझा हात धरला आणि मला घेऊन गेला. हे माझ्यासाठी देखील नवीन होत.. 'निशांत अरे काय हे..,' तु चल... त्याने मला पार्किंग मध्ये नेलं. "काय हे निशांत का अस केलंस...?"

"मुद्दाम केलं तुला म्हाहित आहे तो मुलगा, तुला कसा बघत होता.. मला नाही आवडल. आणि सकाळी मी त्याच्या तोंडात तुझं नाव ही ऐकल होतं. हा तोच आहे ना त्याच्या कानाखाली तु मारली होतीस..??..." " हो.. तो हर्षु चा भाई आहे. काकांचा मुलगा, कालच जॉईन झालाय. निशांत एक सांगू का... पण तू रागावू नकोस. तु सांग मग ठरवतो रागवायच की नाही ते.."

"तु मला घेऊन आलास पण माझी बॅग तिथेच राहिली," मी माझे दात दाखवत, हात वर केले. यावर त्याने फक्त स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतला. "प्रांजल तु पण ना.. तु थांब मी येतो," अस बोलून तो कॅन्टीनमध्ये निघून गेला. मी एकटीच त्या पार्किंगमध्ये त्याची वाट उभी राहिली.

कोणीतरी मागून माझे डोळे धरले म्हणून मी जोरात ओरडले... निशांत.., बालिशपणा बंद कर हा. सोड माझे डोळे. त्याने माझे डोळे सोडले, मी माझ्या डोळ्यांची उघडझाप केल्यावर मला समोर निशांत नाही.., तर हर्षु चा भाऊ दिसला. "ए हॅलो... तुझी हिम्मत कशी झाली मला हात लावायची... "अग किती चिडतेस. मी फक्त तुझ्याशी मैत्री करता यावी म्हणुन आलो. म्हटलं जरा गंमत करू." हे बघ आज केलीस...जर परत अशी फालतुगिरी केलीस तर बघ. ही तुझी गंमत स्वतःकडे ठेवायची. परत मला हात लावलास ना तर त्यादिवशीच लक्षात नाही वाटत." मला चांगलाच राग आला होता.

"ए प्राजु तु तर रागावलीस यार माझ्यावर...! मी तर फक्त मैत्री करायला आलेलो बस. मी काही न बोलता निघाले तर त्याने माझा हात धरला. "हे बघ प्राजु.., मला तुझ्याशी मैत्री करायची आहे. तु प्लीज अस तोंड फिरवून नको जाऊस.." "मिस्टर राज सरनाईक," माझा हात सोड.., आणि मला नसेल करायची तुझ्याशी मैत्री तर... तु हर्षु चा भाऊ आहेस.., म्हणून नाही तर आताच मी प्रिन्सिपलकडे तुझी तक्रार केली असती.

हे सगळं होत असताना निशांत तिकडे आला. "हेय मिस्टर तिचा हात सोड. कळलं नाही का..? मी काय बोललो ते. निशांतला बघून राजने माझा हात सोडला. आणि काय बोललास तु..? तुला मैत्री करायची आहे.. आधी मैत्रीचा अर्थ शिकून ये आणि नंतर कर मैत्री. आणि अजून एक मुलींची रिस्पेक्ट करायला शिक पहिलं. यापुढे तिला परत भेटायचा प्रयत्न केलास ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही." हे सगळं निशांत बोलत असताना मी त्याच्याकडेच बघत राहिले. तो माझ्या जवळ आला आणि मला बाईक जवळ घेऊन जाऊन. त्याने बाईक स्टार्ट केली. मला बसायला सांगितले. राज समोरून आम्ही निघुन गेलो.

आम्ही जाताच राज जवळ हर्षु आली. "भाई तु ठीक आहेस ना..?" कुठे गेली प्राजु..? तु बोललास का तिच्याशी..?? बोल ना भाई काय झालं..?
"काय बोलु हर्षु... तो निशांत आला मध्ये आणि घेऊन गेला तिला. काय प्रॉब्लेम आहे त्या निशांतला जो सारखा मध्ये येतो माझ्या आणि माझ्या प्राजूच्या. त्या निशांतला चांगलीच अद्दल घडवणार आहे आता मी..." "भाई तु निशांतला काही करणार नाही आहेस. राज ने हर्षुकडे वळून पाहिलं...म्हणजे...???


भाई मला निशांत आवडतो. आणि तसही मला नाही वाटत प्राजुच आणि त्याच काही चालू असेल. ते दोघे फक्त डान्स पार्टनर आहेत बस अजून काही नाही. आणि मी बोलेन तुझ्याबद्दल प्राजूशी ओके. तु नकोस टेंशन घेऊस. चल आता जाऊया घरी.


निशांतने बाईक एका बाजुला लावली. मला उतरायला सांगितलं मी गप्पपणे उतरले. बाईक बाजुला लावून मला घेऊन एका रेस्टोरेन्ट मध्ये गेला. मला चेअर वर बसवून त्याने पाणी दिल."प्रांजल कोण होता तो..??" तो हर्षुचा भाऊ होता काल बोलले ना मी तुला. "हो पण तो सारखा तुझा का पाठलाग करतोय. म्हणजे त्याला काय एवढं तुझ्याशी मैत्री करायची आहेस..??" निशांत माझ्याकडे काळजीने पाहत विचारता झाला.


"अरे हे तर मला ही नाही म्हाहित. त्याचा प्रॉब्लेम काय आहे तो. कानाखाली झाल्या दिवसापासून चालू झालय..... नाटकी नुसता....." "ती तुझी मैत्रीण आपल्या एरिया मधल्या पॉलिटीशनची मुलगी आहे ना. "हे बघ मला वाटत तु सांभाळून रहा... हे श्रीमंत माणसाचं सांगता नाही येत. कोणत्याही थराला जाऊ शकतात. मी आहेच सोबत कधी तुला काही वाटलं तर आधी मला कॉल कर. कधी ही कळलं का.. हनी-बी." आणि मला बघून त्याने एक डोळा मारला. छान वाटलं त्याच बोलणं ऐकुन. मग आम्ही थोडं खाल्ल आणि त्याने मला घरी सोडलं.

"तु उद्या येणार आहेस ना..? कितीला येशील..??" यासर्वात मी विसरले की आज शनिवार होता आणि उद्या मला त्याच्या घरी जायचं होतं. "निशांत मला घ्यायला येशील का तु.??" आधी नाही बोलत नंतर त्याने होकार दिला. मग उद्या दहा वाजता भेट आणि हो लवकर तय्यारी करायची हा, नाही तर तुम्हा मुलींना खुप वेळ लागतो मेकअप करायला आणि हसायला लागला. त्याच्या पाठीत एक धपाटा घातल मी त्याला बाय केले आणि घरी आले.


आज परत निशांतने मला वाचवलं होत. म्हणजे ते नाही का प्रत्येक पिक्चरमध्ये एक हिरो असतो जो नेहमी हेरॉईनला प्रत्येक धोक्यापासून वाचवतो... तसच काही. छान वाटलं आज ज्या पद्धतीने त्याने मला ट्रीट केलं ते. त्याने माझी काळजी घेणं आज काल मला जास्तच आवडू लागलं होतं. मी आरशात बघुन स्वतःशीच बडबडत होते. बोलता बोलता माझी नजर स्टडी टेबलवर ठेवलेल्या त्या गिफ्टवर गेली जे मला निशांतने दिल होत... हनी-बी वाल.... त्याच्या तोंडातुन हनी-बी किती गोड वाटत नाही...


डान्समुळे का होईना मला छान मित्र मिळाला होता. वरून जरी कडक, अकडु असला तरीही आतुन मात्र आंब्यासारखा गोड. गणुचे आभार मानुन मी आईला मदत करायला गेले.

आयुष्यात कधी वाईट, तर कधी चांगले क्षण येत असतात. पण त्या क्षणात आपली काळजी घेणारा जवळचा एक मित्र असल्यावर आपण ते वाईट क्षण ही विसरून जाऊ शकतो.

to be continued.........


(कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कथेचा भाग कसा वाटला हे नक्की सांगा.)


स्टेय ट्युन अँड हॅपी रीडिंग

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED