Julale premache naate - 9 books and stories free download online pdf in Marathi

जुळले प्रेमाचे नाते - भाग-९

कालचा दिवस एवढा गोड आणि आनंदी गेलेला की मी सारखं ते आठवुन गातल्या गालात हसत होते. फ्रेश होऊन आज लवकरच कॉलेजला पाहोचले.
स्वतःचा अभ्यास करत बसले होते की हर्षु आली..

"काय ग प्राजु निशांत ला पाहिलस का ग तु.??? आल्यापासून दिसला नाही मला. तुला माहीत आहे ना त्याला बघितल्या शिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही..?!!!"
हर्षुच्या अशा बोलण्याने मी गप्प होते. पण माझ्या फेसवरील स्माईल तिने अचुक ओळखली.

"काय ग प्राजु तुला काय झालं..?? एवढी का हॅप्पी आहेस..??" तिने डोळा मारत विचारल.

"काही नाही ग. सहजच." मी ही काही तरी बोलायच म्हणून बोलले खर पण निशांत सोबतच्या आठवणी आठवुन नकळत माझ्या चेहऱ्यावर गोड हसु येत होतं.

पण काही नाही झाल्याच दाखवत मी गप्पपणे स्वतःच काम करत बसले. नंतर आमचे लेक्चर मध्ये आम्ही बिझी झालो. काय आहे ना एक्साम ही येत होत्या. त्यामुळे आम्हाला अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण महत्त्वाच होत.

आजकाल प्रॅक्टिस ही थांबली होती. आधी एक्साम आणि नंतर प्रॅक्टिस अस ठरवून आम्ही आमचा अभ्यास करत होतो.

"प्राजु.. मी निशांत ला प्रपोज कधी करू ग..?? म्हंजेबघ ना तो कोणाला करण्याआधी मीच त्याला प्रपोज करते..कशी आहे माझी आयडिया..??!!" हर्षु माझ्याकडे बघत बोलली. मी फक्त एक स्माईल दिली. कारण बाकी करणार तरी काय होते नाही...!!

"तुला माहीत आहे का..? म्हणजे तुम्ही एकत्र प्रॅक्टिस करता सो त्याने कधी कोणा मुली बद्दल विषय काढला असेल ना कधी तरी.??? बोलला आहे का कोणा बद्दल कधी.???" हर्षुचे एका मागोमाग एक असंख्य प्रश्न येत होते.

"आता हिला काय सांगु की निशांतच्या मनात नक्की कोण आहे की नाही हे मलाच नाही माहीत. आणि निशांतला हर्षु फक्त मैत्रीण म्हणून आवडेल जीवनसाथी म्हणून नाही." माझं मनातल्या मनात विचार चालु होते की मधेच तिच्या बोलण्याने मी भानावर आले.

"अग प्राजु काय ग कवय झालं.??? मी काही विचारलं तुला..??"

"नाही ग माहीत. म्हणजे त्याने कधी हा विषय काढला नाही कोण मुलीबद्दल."

"मग तु विचारशील का प्लीज ग प्राजु.."

"अग मी कसा विचारणार अस डायरेक्ट.???"

"अग सहज विचार ना... म्हणजे फक्त त्याच्या मनात कोणी नाही ना एवढंच हवं आहे. आता तुझ्या बेस्टफ्रेंडसाठी एवढं ही नाही का करणार तु.??"


"बर ठीक आहे मी विचारेन त्याला. पण तुझं प्रेम आहे हे तूच सांगायचं हा. मी नाही सांगणार. चालेल ना.??!!" मी लगेच सांगून टाकलं कारण मला माहित होतं की निशांतला हर्षु ही फक्त मैत्रीण म्हणुन आवडते.

"हो ग चालेल. मीच सांगेल त्याला माझ्या मनातल. तु फक्त त्याच्या मनात कोणी नाही ना एवढं बघ." हर्षु खुश होत बोलली.

"चल मी जाते आता." एवढं बोलून मी निघाले. खरतर सटकले कारण तिच्या अजून प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नव्हतीच. खरतर मला ही जाणुन घ्यायचं होत निशांतच्या मनात कोणी आहे का... पण अस डायरेक्ट विचारणं बर वाटत नव्हतं. मग काही तरी विषय काढुन विचारू अस ठरवून मी निघाले.


कँटीनमध्ये राज, हर्षु आणि निशांत बसले होते. मी मागूनच गेले. हर्षु तर निशांतला अशी बघत होती जशु काय आता खाऊन टाकेल. याचा मला राग ही येत होता आणि आश्चर्य ही वाटत होतं की मला अस का वाटावं. जास्त विचार न करता मी जाऊन बसले.

"हाय गाईज...!!"
मी जाताच राज उठुन उभा राहिला आणि मला बसायला चेअरअर दिली.

"थँक्स राज. झाला का अभ्यास..? आणि निशांत आता काही दिवस आपली प्रॅक्टिस बंद असेल ना..??" माझ्या या वाक्यावर त्याने फक्त मान डोलावली.

"गाईज चला आज माझ्या घरी जाऊया." मधेच राज बोलला.

"आज नको राज मला काम आहे." त्याला तोडत निशांत उद्गारला.

"तु चल प्रांजल.." त्याने माझ्याकडे पाहिले. तस निशांतने ही माझ्याकडे पाहिलं आणि मला नकार द्यावा लागला.

"आज नको नेक्स्ट टाईम नक्की येऊ राज.." मी एक स्माईल देत बोलले आणि तो विषय तिथेच संपला.

"ठीक आहे चालेल. पण नेक्स्ट टाईम मला कारण नको हा. नक्की यायच तुम्ही.." राजच्या या वाक्यावर आम्ही त्याला थम्ब दाखवला. आणि घरी जायला निघालो.

आज मला निशांत सोडणार होता. खरतर ती आज आमच्याकडे येणार होता. हा चांगला मोका होता त्याच्या मनामध्ये कोणी आहे का हे जाणुन घेण्याचा.

आम्ही बाईकने माझ्या घराच्या दिशेने निघालो. जाताना एका गणपतीच्या मंदिरात जायला काही विसरलो नाही. तिथून थेट घर गाठलं.

"अरे वाह..! आज निशांत आपल्याकडे आला." आई दरवाजात उभी राहूनच बोलली.

"कशा आहेत आई." निशांत आईच्या पाया पडत बोलला.

"मी मस्त बाळा. तु कसा आहेस..?? आणि आई-बाबा कसे आहेत"

"मी पण छान. आणि आजी-आजोबा ही छान आहेत."

आता येत पाणी वैगेरे घेऊन अशी माझ्या रूममधे आलो.

"निशांत काही काम होत की सहज आलास..??" मी त्याच्याकडे बघत विचारले.

"का ग आता मी इकडे काही काम असेल तरच येऊ का..?? ठीक आहे जातो मग.. " एवढं बोलून तो जाण्याच नाटकं करू लागला.

"अरे अस कुठे म्हटलं मी. मी सहज विचारलं निशांत..!!"

"अग मस्करी केली. खरतर चार वाजता मला आमच्या नातेवाईकांकडे जायचं आहे. आणि तुमच्या इथेच राहतात म्हणुन इथे आलो. मला जवळ पडेल ना म्हणून बाकी काही नाही मॅडम." तो बेडवर स्वतःला झोकून देत बोलला.

"ओके सर. मग जेवुन जाशील ना..?? तस आईला सांगते.

"हो म्हणजे काय इकडे आल्यावर आईंच्या हातचं जेवल्या शिवाय कोण जाईल.." स्वतःच्या ओठांवर जीभ फिरवत तो बोलला तस मला हसूच आलं..

"वेडाच आहेस. आले सांगून" एवढं बोलून मी बाहेर गेले.

परत आले तेव्हा हा खिडकीत बसून बाहेर खेळणाऱ्या लहान मुलांना बघत होता. हचून मागून जाऊन मी ही यायच्या शेजारी उभी राहिली..

"किती गोड असतात ना ही लहान मुलं..??" त्याच्या अचानकपणे आलेल्या वाक्यावर मी जरा दचकले.. आणि आश्चर्याने पाहिलं ही...

"याला लहान मुलं आवडतात..??? खडूस आहे की असल्याचं नाटक..??" मी स्वतःशीच बोलत होते.

माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याला बघुन आधी तो हसला... "काय ग असा का बघत आहेस..?? मला काय लहान मुलं आवडत नसतील अस वाटलं असेल ना...! पण मला आवडतात हा लहान मुलं. गोड निरागस असतात ती.. त्यांना बघुन आनंद मिळतो.. "

तो भरभर सगळं बोलत होता आणि त्याच्या प्रत्येक वाक्यावर मी मात्र चांगलेच आश्चर्यकारक होत होते.

"अरे वाह म्हणजे खडूस ला लहान मूल आवडतात...!" माझ्या या वाक्यावर त्याने एक मोठी स्माईल दिली.

"बर एक विचारू का.??" मी जरा घाबरतच त्याला विचारलं.

"हा बोल ना अशी परवानगी घेते आहेस...??" त्याने माझ्याकडे बघत विचारल आणि नंतर हसला..

"तस नाही काही.. तुला हर्षु कशी वाटते..??" मी जरा घाबरतच विचारलं..

"चांगली आहे फ्रेंड म्हणुन.. पण जरा तीच वागणं खटकत कधी कधी. पण मैत्रीण म्हणूनच चांगली आहे. काय आहे ना तिच्या मनात काय चालु आहे याचा अंदाज आहे मला.. तिला म्हणावं तस काही होणे नाही."

त्याच्या या बोलण्यावर तर गप्पच बसले...


"का ग मधेच हा विषय..?? तु काय माझी सेटिंग लावत आहेस की काय तिच्यासोबत."

"अस काही नाही.. पण हर्षु खुप चांगली मुलगी आहे निशांत.. आणि मी काही कोणाची सेटिंग लावत नाहीये." मी जरा रागातच त्याच्याकडे पाहिलं.

" नाही अस काही असेल ना प्रांजल तर तसा विचार ही करू नकोस.. नाही तर माझ्या पेक्षा वाईट कोणी नाही..." एवढं बोलून तो बाहेर निघून गेला..

"अरे हा काय असा बोलून गेला.. मी फक्त विचारलं होत. मी ही जरा रागावले.

फ्रेश होऊन बाहेर गेले तर हा जेवुन वैगेरे मला न सांगता निघून गेला होता. म्हणजे एवढा राग यावा माणसाला..

"ठीक आहे. आता मी ही नाही बोलणार अस ठरवून मी जेवले आणि स्वतःच्या रूममधे येऊन झोपले..

संध्याकाळी हर्षुच्या कॉल ने जाग आली.. "आता हीला काय झालं.." जरा कंटाळातच मी कॉल घेतला.

"हाय प्राजु... कळलं काग निशांतच्या मनात कोणी आहे का..??"

"तिने कॉल हे जाणून घेण्यासाठी केलेला.. काय बोलु आता... जरा नाखुषीनेच मी बोलले..

"नाही ग काही बोलण झालं नाही.. आणि काही बोलला ही नाही त्याच्या मनात कोणी आहे या बद्दल..." मिबकही ही सांगत होते. नाही तर काय सांगणार होते की निशांतला हर्षु आवडत नाही.. हे ऐकून हर्षुला किती वाईट वाटलं असत म्हणून काही न बोलण बर होत. थोडं बोलून मी कॉल ठेवला..


फ्रेश होऊन चहा- नाश्ता करून स्वतःचा अभ्यास करत बसले. पण या सर्वांत निशांतचा कॉल की एक मॅसेज आला नाही.. "स्वतःच रागवायचे ते ही काही ही कारण नसताना.. आणि न सांगता निघून जायचं.." मी स्वतःशी पुतपुटले.

"जाऊदे आता मी ही मॅसेज किव्हा कॉल करणार नाही." एवढं बोलून स्वतःला गुंतवून ठेवलं. रात्री बाबांशी बोलून थोडं जेवण जेवले. पण पूर्ण लक्ष मात्र मोबाईलवर होतं. पण एक ही मॅसेज की कॉल आला नाही.

शेवटी कंटाळुन मी झोपले.. माणसाने राग तरी किती ठेवावा ना मनात. आता त्याला वाटलं तर येईल असं ठरवून मी झोपी गेले..

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED