Julale premache naate - 35 books and stories free download online pdf in Marathi

जुळले प्रेमाचे नाते - भाग-३५

माझ्या या वाक्यावर तर दोघी चांगल्याच उडाल्या. अभि शांतपणे ऐकत होती.. "अग, काय हे... नुसता मूर्खपणा आहे. हे अस वागून त्या मूर्ख, मंद मुलीला तीच प्रेम मिळालं असत का.??" वृंदा रागावतच बोलली. "ती हर्षु अक्कल शून्य गाढव आहे का?? आणि नंतर काय झालं म्हणजे.. आणि तुला जास्त काही झालं नाही ना ग..???" प्रियांकाने काळजी पोटी विचारले असता. मी फक्त हसुन मानेनेच नकार दिला. पण या सर्वांत अभि जरा शांत बघून प्रियाच बोलली....


"अग., अभि तु काहीच नाही का ग बोलणार.???" तिने आश्चर्याने पाहिलं अभिकडे. "माहीत होतं मला.." अभि शांतपणे बोलली. तस दोघीही ओरडल्याच.. "तुला माहित होत.??? आम्हला सांगावसं नाही का वाटलं तुम्हा दोघांना..??" दोघींनी एकत्र रागवत विचारलं.. यावर अभिने माझ्याकडे पाहिलं.... मीच मग सगळं सांभाळून घेत बोलले.


"अरे, आता तुम्ही आता त्यावर भांडु नका. हे सगळं झालं तेव्हा एकतर मी शुद्धीत नव्हते." तेव्हा कुठे त्या शांत झाल्या.. आणि मी पूढे बोलायला सुरुवात केली. तर झालं असं...


मी रस्त्यावर त्या रक्ताच्या थारोळ्यात पडले होते... की अचानक कोणी तरी मला जवळ घेतल्याचा भास झाला... एवढं होऊन देखील मला तो स्पर्श जाणवत होता.. आपल्या जवळच्या व्यक्तीचा स्पर्श कळतोच नाही...!!


तो निशांत होता.... मला स्वतःच्या छातीला लावून आरडाओरडा करणारा वेडा... राजच्या गाडीमध्ये त्यांनी मला बसवलं. मी आता तर निशांतच्या अगदी जवळ होते.. एकदम जवळ की, ती वाईट हर्षु सुद्धा मला त्याच्या पासून वेगळं करू शकत नव्हती. मी अलगद डोळे उघडले.... काही कळत नव्हतं आजूबाजूचं.... फक्त दिसत होता तो पाण्याने डोळे भरून माझ्याकडे बघणारा निशांत. मधेच राज वर ओरडणारा निशांत.. माझा खडूस निशांत, किती त्रास होत होता त्याला.. त्या मुलीमुले. खरचं आज हर्षलने दुखावलं मला.


याच वाईट नव्हतं वाटलं की, तिने मला त्रास दिला.. पण माझ्या निशांतला मात्र तिने दिलेला त्रास मला सहन होत नव्हता... त्या अवस्थेत ही माझे डोळे भरून वाहत होते हे निशांत बघत होता.... "नाही हा हनी-बी... काही होऊ देनार नाहीये मी तुला.... रडायचं नाहीस तु... मी आहे ना. करेल सगळं ठीक. आणि तो तुझा गणु आहे ना...?? होईल ठीक. बस तु रडु नकोस आणि डोळे बंद करू नकोस." हे सांगताना ही तो रडत होता. खरच खुप रडवलं माझ्या निशांतला.
पण मला ही नाही जमल जास्त वेळ त्याला बघत रहायला आणि मी हळूहळू डोळे बंद केले.हॉस्पिटलमधल्या त्या ऑपरेशन थेटरमध्ये बेडवर झोपलेल्या व्यक्तीचा रक्ताने भरलेला चेहरा नवीन जॉईन झालेले इंटर्न पुसत होत्या. तर हातात हॅन्डग्लोज घालून एक डॉक्टर स्वतःला तय्यार करत होते. ठिकठिकाणी झालेल्या जखमा पुसण्यात आल्या. त्यानंतर त्या डॉक्टरने त्या जखमा शिवून स्वतःच काम पूर्ण केलं. हे सगळं होत असताना ही त्या शांत चेहऱ्यावर मात्र कोणतेच भाव दिसत नव्हते.. ना वेदना, ना दुःख. डॉक्टरच काम होताच बाहेर चालु असलेला पिवळा बल्प बंद झाला. आणि डोक्यावर टेंशन असलेल्या व्यक्तींनी आपले पाय दरवाजामधुन बाहेर आलेल्या डॉक्टरकडे वळवले.


"डॉक्टर माझी मुलगी कशी आहे....?? ठीक आहे ना ती..???" रडवेल्या सुरात त्यांनी डॉक्टर ला विचारले. "तुम्ही माझ्या केबिनमध्ये या. आपण तिथे बोलु." एवढ बोलून डॉक्टर स्वतःच्या केबिनमध्ये निघुन गेले. बाबा आणि निशांत दोघे ही केबिनमध्ये पोहोचले."या बसा..." डॉक्टर जरा शांतपणे बोलले. "डॉक्टर माझी मुलगी ठिक आहे ना???" ते दोघे बसत बोलले. "हे बघा मिस्टर प्रधान.., तुमच्या मुलीचा ऍकसिडेंट झाल्याने खुप रक्त वाहून गेलं आहे. आणि त्यात डोक्याला मार लागल्याने सध्या तरी आम्ही काही सांगू शकत नाही. आपण तिचे डोक्याचे एक्सरे काढु त्यावरून आपल्याला कळेल की, कितपत मार लागलाय हे कळेल. त्यानुसार आपण तिच्यावर ट्रीटमेंट करू. " एवढं बोलून ते शांत झाले.


हे ऐकून तर बाबांना रडु कोसळलं. निशांत त्यांना शांत करत होता. मग काही बोलून ते बाहेर आले. निशांत मला ठेवलं होतं त्या आय सी यु च्या त्या काचेतून बघत होता..बिप बीप करणाऱ्या मशीन आजूबाजूला आवाज करत होत्या. त्यांचं काम त्या चोख पार पाडत होत्या... एका मशीनमध्ये आडव्या- तिडव्या रेषा बेडवर झोपलेल्या पेशंटचे मरणं- जगणं ठरवत होत्या. काही वेळाने डॉक्टर आले आणि त्यांनी त्यांच्या हातात असलेलं इंजेक्शन समोरच्या निपचित पडलेल्या पेशंटला टोचले.., तरीही त्या निपचित पडलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव दिसत नव्हते. ती मी होती. हे सगळं निशांत त्या बंद दरवाजा आड राहून बघत होता. नकळत त्याच्या डोळ्यातुन अश्रु खाली गालावर येऊन थांबले.


नर्सला काही सूचना करत ते डॉक्टर बाहेर आले.. "मी तिला एक इंजेक्शन दिल आहे. या काही मेडिसिन आहेत घेऊन या." एवढं बोलून त्यांनी निशांतच्या हातात एक कागद दिला आणि ते निघून गेले. त्याने बाबांकडे पाहिलं. भिंतीला डोकं लावून ते शांत बसून होते. खांद्यावर आई रडून रडून शांत झोपलेली. त्यांना बघुन तोच गेला मेडिकलमध्ये.
रात्रीच्या त्या मिठ्ठ काळोखात कोणी तरी खोलीच्या कोपऱ्यात बसुन रडत होत... ती हर्षु होती.. "काय केलं आपण आज...? आज आपण आपल्या बेस्ट फ्रेंड ला जिवानिशी मारायचा प्रयत्न केला.. फक्त निशांतसाठी..??" स्वतःशीच ती बडबडत होती. "पण बराच होईल.., ती मेली तर निशांत आपला होईल.." स्वतःशीच हसत होती. "पण अस कोणाला मयून प्रेम मिळेल.. पण जर निशांतला कळलं तर.. की हे सगळं आपणच केलं आहे.. मग काय होईल." स्वतःशी बडबडत ती वेड्या सारखी वाहगत होती.रात्री डॉक्टर परत तपासायला आलेले. पण काहीच हालचाल नव्हती हे बघून त्याच्या चेहऱ्यावर टेंशन स्पष्ट दिसत होत. ते तसेच बाहेर आले. "मिस्टर प्रधान.., जरा बाजुला येता का.???" त्यांनी हाक मारून त्यांना बोलावून घेतलं. सोबत निशांत होताच. "काय झालं डॉक्टर..? माझी मुलगी ठीक तर आहेत.???" बाबांनी जरा टेंशनमध्येच विचारल. थोडा वेळ घेऊन डॉक्टर बोलले...,"मिस्टर प्रधान.., तुमच्या मुलीला अजून शुद्ध आली नाहीये.. काल रात्रीपासुन ती तशीच आहे.. मेडिसिनला ही रिस्पॉन्स देत नाही आहे."


"ती जर सकाळ पर्यंत शुद्धीत नाही आली तर ती कोमात जाऊ शकते." हे ऐकताच बाबांना चक्कर सारख झालं.. निशांतने सांभाळलं. "तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. आम्ही आमचे प्रयत्न करतो." एवढं बोलून डॉक्टर निघून गेले. निशांतने बाबांना आधार देत चेअरवर बसवलं. आणि पाणी आणुन दिल. तो आणि राज सगळं काही सांभाळत होते."बाबा तुम्ही नका टेंशन घेऊ. तो देव आहे ना.. आणि आपली प्रांजु लवकर होईल ठीक." तो त्यांना धीर देत होता. पण त्याच्याही मनाचे हाल काही वेगळे नव्हते. "बाबा, बस त्या देवाकडे प्रार्थना करा." एवढं बोलुन त्याने डोळ्यातलं पाणी बाजुला जाऊन पुसलं. आणि तो निघाला. "राज.., मी बाहेर जातो आहे. काही झालं तरीही मला कॉल कर." एवढं बोलून तो निघाला.


हॉस्पिटलमधल्या मंदिरातल्या गणपतीकडे हात जोडले. "येतो आहे मी..." एवढंच बोलून निशांत चालत निघाला होता. त्या दगडांवर आपले अनवाणी पाय ठेवून तो निघाला.. सिद्धिविनायक मंदिराच्या दिशेने. मनात फक्त त्याचच नाव घेत होता. चालत होता मधेच धावत होता.. वाट मिळेल तसा तो निघाला होता... तो निघाली तेव्हा रात्र होत होती.... चालत त्या रात्रीच्या काळोख्यात पळत सुटला होता.. त्याला नाही भान होत जखमेचं की काही होण्याचं.. बस त्याला पोहोचायचं होत ते त्या गणपतीच्या मंदिरात...तो पोहोचेपर्यंत बारा वाजले होते. मंदिरे बंद करणारे मंदिर बंद करत होते की, निशांत त्या वेळेस पोहोचला. "अहो काका, प्लीज मला एकदा दर्शन देऊ द्या. खूप लांबुन आलो आहे." फुललेला श्वास घेत निशांत बोलला. "बाळा टाईम बघ किती झाला आहे. एक काम कर तिकडे झोपायची व्येवस्था आहे. तिकडे आराम कर आणि उद्या दर्शन घे." त्यांनी ही स्वतःच काम करत सांगितलं.


To be continued....

Stay tuned and Happy reading

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED