जुळले प्रेमाचे नाते - भाग-३४ Hemangi Sawant द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जुळले प्रेमाचे नाते - भाग-३४

घरी आले. निशातने ने मला सोडलं आणि तो निघून गेला होता. आज बाबा ही ऑफिस मधून लवकरच आले होते. फ्रेह होऊन बाबांशी गप्पा झाल्या. मग आम्ही जेवुन घेतलं आणि मी बेडवर अंग टाकलं.


दिवसभराच्या गोष्टी मनात घोळत होत्या... राहून राहून वाईट हर्षल च वाटत होतं..., पण राग ही आलेला तिच्या वागण्याचा. आनंद होत होता तो निशांत आपल्या आयुष्यात आल्याचा.. परत एकदा देवाचे आभार मानुन मी झोपी गेले.



असेच दिवस जात होते. आम्ही रोज निशांतच्या घरी प्रॅक्टिस करत होतो. कॉलेजमध्ये ही सगळी काही नॉर्मल झालेलं. फक्त मी आणि हर्षु काही आधी सारखे फ्रेंड्स नव्हतो. मी आणि स्वतःचा अभ्यास असच काहीसं चालू होतं माझं.



आणि तो दिवस आला. डान्स कॉम्पेटेशन... उद्या ते होत आणि माझी तर झोपच गायब झालेली..मी आणि निशांत खूप मेहनत घेत होतो... आजचा दिवस शेवटचा होता प्रॅक्टिसचा. आम्ही सगळी डान्स प्रॅक्टिस एकदा शेवटची केली. सगळं चेक केल. सीडी, ड्रेस वैगेरे. यावे मला घरी सोडलं आणि तो स्वतःच्या घरी गेला.


जेवताना आई-बाबांना सांगितलं मी कॉम्पेटेशन बद्दल. दोघांनीही ऑल द बेस्ट देऊन टाकलं. जेवुन मी स्वतःच्या रूममधे आले. सहज म्हणून मोबाईल बघितल तर त्यात निशांतचे मॅसेज.
मी लगेच रिप्लाय देऊन टाकला... आणि वाट बघत बसले..



त्याचा मॅसेज आला... "हेय हनी-बी जास्त टेंशन नको घेऊस... सगळं काही छान होईल हा." आणि एक स्माईल चा सिम्बॉल. मी देईल "हो" म्हटलं. परत त्याचा मॅसेज....



"आणि हो तुझ्यासाठी आहे काही तरी.. डान्स नंतर मी तुला प्रपोज करणार आहे. तस आपलं ठरलं होतं." हे वाचुन तर माझे हार्ट बिट्स जोरात धडकायला लागले.. आता डान्स पेक्षाही मला निशांत प्रपोज करणार याचीच जास्त भीती वाटत होती.. आणि सोबत आनंद ही वाटत होता.


थोडं बोलून आम्ही लवकर झोपायच ठरवल. गुड नाईट बोलून आम्ही झोपी गेलो.



आईच्या हाकेने जाग आली... मी लगेच उठुन बसले. घडाळ्यात सकाळचे आठ वाजले होते. मग सकाळचं रुटीन करून कॉजेलमध्ये गेले. आज कॉलेजमध्ये सगळीकडे धावपळ होती. डान्स कॉम्पेटेशन जे होत. दुपारी बारा वाजता कॉम्पेटेशन चालू होणार होत..


मी पोहोचताच निशांतला कॉल केला.. "हॅलो निशांत..., कुठे आहेस.?? मी आले आहे कॉलेजमध्ये." तिकडून तो बोलत होता... "अग मी ऑडीमध्ये आहे बॅकस्टेजला आहे तु पण ये.." एवढं बोलून त्याने कॉल ठेवला.


मी हातातली पिशवी घेऊन तिकडे गेले. बॅकस्टेजला चांगलीच गर्दी होती. त्या गर्दीतीन वाट काढत मी निशांत जवळ पोहोचले. "आलीस तु ये.. ही माझी फ्रेंड माधवी आहे जी तुझा मेकअप करून देईल." त्याने यीची ओळख करून दिली. "हाय..," तिने लगेच स्वतःचा हाय पूढे केला. मी पण स्वतःचा हात पूढे केला.


छान होती माधवी. आम्ही लगेच चांगले फ्रेंड्स झालो. बघता बघता अकरा वाजले. तसा बाहेर गर्दीचा आवाज वाढू लागला होता.. हे सगळं बगजं मला तर दडपण या आलेले बघट निशांत माझ्या जवळ आला.


"काय भीती वाटतेय की काय..? त्याने माझ्याकडे बघत विचारल. मी जरा घाबरतच होकार दिला. मग त्याने मला श्वास आत बाहेर करायचा सांगितलं तस बर वाटलं.


"कस कळत या मुलाला आपल्याला काय हवं असत.." स्वतःशीच पुटपुटले. छान वाटलं निशांत आपल्या लाईफमध्ये आहे याचा अभिमान वाटत होता. मग आम्ही सगळे तयारी करू लागलो. माधवीने मला तयार केलं. तीच नंतर ही मदत करणार होती. थोडा मेकअप करून मी तय्यार झाले.



बाहेर एक एक डान्स होत होता. तशी माझ्या हृदयाचे ही ठोके वाढत होते. आणि आमच्या नावाची घोषणा झाली. सॉंग चालू झाल....

ठरल्या प्रमाणे मी एका विंगेतून स्टेजवर गेले आणि निशांत एका... आणि रेकॉर्डिंग चालू झाली... मी समोर बघत होते आणि निशांत माझ्याकडे...



"मैत्री करशील माझ्याशी..???" त्याने माझ्याकडे बघून विचारल. मी समोर बघत उत्तर दिल.
"मी कशी मैत्री करणार..??? मी गरीब आहे आणि तु श्रीमंत"


"मला तर चालेल.., बनशील का माझी मैत्रीण.." निशांत स्टेजच्या मध्ये भागी येत बोलला.


"हो.., मला ही चालेल." एवढं बोलून मी देखील त्याच्या समोर येऊन उभे राहिले. आता पाहिलं रेकॉर्डिंग संपलं होत. तशी म्युझिक चालू झाली..


"तू आता है सीने में, जब-जब सांसें भरती हूँ...."
हे लागताच मी निशांतच्या छातीवर हात ठेवला आणि आम्ही डोलू लागलो.



"तेरे दिल की गलियों से, मैं हर रोज़ गुज़रती हूँ"
मी लगेच दूर झाले तस त्याने माझा हात धरला आणि मला जवळ खेचलं....



"हवा के जैसे चलता है तू, मैं रेत जैसे उड़ती हूँ"...
मी त्याच्या चेहऱ्यावर स्वतःचे हात फिरवले आणि पुढच्या ओळीला त्याच्या समोर राहून आम्ही वाकुन गोल फिरलो...


"कौन तुझे यूँ प्यार करेगा?.., जैसे मैं करती हूँ"
मी त्याच्या डोळ्यात प्रेमाने पाहिलं आणि त्याने मला उचलून गोलगोल अस चार वेळा फिरावल.....



मग काही सलसा स्टेप्स झाल्या... एकमेकांच्या मागे पूढे करणं.., गोल फिरणवं वैगेरे.



रेकॉर्डिंग चालू झाल...

"मला तुला एक सांगायचं आहे." तो बोलला..
मी हसुन पाहिलं. "मला एक मुलगी आवडते.." हे ऐकताच मी मनातून घाबरले. आणि हसुन त्याच्याकडे पाहिलं.


"मेरी नज़र का सफ़र..,तुझपे ही आके रुके..."
या ओळीच्या वेळी.. मी त्याचा चेहरा आपल्या ओंजळीत घेतला.. आणि मी त्याच्याकडे बघत राहिले. आणि डोळ्यात पाणी आल.


"कहने को बाक़ी है क्या?.., कहना था जो कह चुके"
तो माझ्यापासून दूर गेला.... मी त्याच्याकडे स्वतःचा हात पूढे जरून उभी राहिली. आणि स्वतःच्या गुढग्यावर वर खाली बसले रडत..


तो धावत माझ्या जावळ आला आणि मला मिठीत घेतले... आणि सोबत आणलेला आरसा मला दाखवला.. "ही मुलगी मला आवडते.." स्वतःला बघून मी त्याला घट्ट मिठी मारली. आणि स्टेजवर अंधार झाला. आम्ही लगेच पळत बॅकस्टेज ला गेलो आणि मी कपडे बदलले.


परत रेकॉर्डिंग चालू झाली.. आम्ही परत समोर उभे होतो.
"काय झालं अशी का दूर का उभी आहेस..???" त्याने विचारल असत मी उत्तर केलं की,

"आपल्यात बरोबरी होऊ शकत नाही.. तु श्रीमंत आणि मी गरीब. आपल्यात प्रेम कस शक्य आहे..?"

"प्रेमात नाही ग श्रीमंत- गरीब बघत.. बघतात ते प्रेम आणि दोन माणसांची मन.. एकदा का मनं जुळली की, त्यांना कोणीच वेगळं करू शकत नाही...."
मी फक्त त्याच्याकडे बघत होते.


"तू जो मुझे आ मिला सपने हुए सरफिरे"
मी धावत याच्या जवळ आले आणि त्याने मला हाताला धरून गोल फिरावल...


"हाथों में आते नहीं उड़ते हैं लम्हे मेरे"
त्याच्या चेहऱ्यावर स्वतःचा एक हात तर दुसरा खांद्यावर आणि आम्ही एक सालसा ची स्टेप केली..


"मेरी हंसी तुझसे, मेरी ख़ुशी तुझसे"
त्याने मला अर्ध उचलून हवेत घेतलं आणि गोल फिरवत होता.. आणि खाली आणुन मी त्याला बघत त्या ओळी बोलल्या...



"तुझे खबर क्या बेकदर"
तो दूर जाताच मी त्याला मागून मिठी मारून थांबवलं...


आणि शेवटच्या काही स्टेप्स केल्या... शेवटची स्टेप्स होती की, त्याने मला पूर्ण वर उचललं आणि गोल फिरवत खाली आणल आणि मी त्याच्या मिठीत विरून गेले.. आणि आमचा डान्स संपला...


गाणं संपताच सगळीकडून आवाज ऐकू येत होता. शिट्या, टाळ्या ऐकू येत होत्या. आम्ही बॅकस्टेज ला आलो तसे सर्वजण आम्हला शुभेच्छा देत होते..


"खरचं सुंदर केलात तुम्ही डान्स." " खूप छान.." "बेस्ट कपल निशांत अँड प्रांजल."
सगळे ओरडत होते.
माझी आणि निशांत ची नजर नजर झाली.. त्याने लांबूनच थम्ब दाखवला..


त्यांनंतर आम्ही कपडे बदलले आणि डान्स बघत बसलो. सगळे डान्स मस्त होते आणि तो क्षण आला.. स्पर्धा कोण जिंकले याची घोषणा होत होती.. टॉप पाच मधले तीन नाव घेऊन झाली होती.. आता तर दुसर ही नाव घेतलं.. मला तर रडूच कोसळलं होत..


कारण माझ्यामुळे निशांतला यावर्षी प्राईज मिळणार नव्हतं. तोच पहिल्या विजेत्याच नाव घेतलं...
आणि पहिले विजेते आहेत... वन अँड ओन्ली... निशांत अँड प्रांजल.... हे ऐकून तर मला विश्वासच बसत नव्हता...


निशांतने तर मला मिठीच मारली.. आम्ही दोघेही स्टेजवर गेलो आणि ती ट्रॉफी घेतली... सगळे कल्ला करत होते... हिप हिप हुर्रे... चिअर्स फॉर निशांत अँड प्रांजल....

काही जणांनी तर निशांतला उचलून घेतलं... हे सगळं झालं आणि आम्ही बाहेर आलो सर्वाना भेटुन...



अचानक आठवण झाली ती निशांतच्या प्रपोजल ची आणि मी शहारले... मनाशीच हसुन त्याने बोलावल तिथे गेले.. त्याने मला कॉलेजमधल्या गार्डनमध्ये बोलावल होत.. मी पोहोचले तर निशांत आधीच येऊन उभा होता.. त्याच्या हातात होती एक बॅग ज्यात त्याने घेतलेली नऊवारी साडी होती.

तो स्वतःच्या गुडघ्यावर बसला आणि त्याने मला विचारले....

"हनी-बी... मला काही छान नाही बोलता येत.. पण एवढंच म्हणेल की, या खडूस माणसाला मनापासून स्वीकारशील का..???" हातातली साडीची बॅग पुढे करत त्याने विचारल असता मी देखील खाली बसले आणि त्याच्या हातातली बॅग घेत होकार दिला.



त्याने तर उभं राहतं उडयाच मारल्या.. तोच त्याला कॉल आला आणि तो सरांच्या ऑफिसमध्ये निघून गेला.. मी तिथेच बाजूला असलेल्या एका बाकड्यावर बसून हसत होते.. आणि सोबत रडत ही होते. आनंदच एवढा झालेला.



तोच मागून कोणी तरी माझ्या खांद्यावर हात ठेवला.. ती हर्षु होती... "खुप छान झाला डान्स तुमचा." ती बाजूला येऊन बसत बोलली. "सॉरी प्राजु.., मी त्या दिवशी जरस अतीच केलं. मला माफ कर." तिने माझी माफी मागितली म्हणून मी देखील माफ केले.



"चला माझा कडून तुला पार्टी अस बोलून बळेबळेच मला कॅन्टीनमध्ये घेऊन गेली.. भूक नाही म्हणून ज्युस घेतला.. "अग माझ्यासाठी पाणी घेऊन येतेस का.." मी तिच्यासाठी पाणी आणल आणि आम्ही एकत्र ज्युस घेतला.


"माझ्यासोबत बाहेर येतेस का.. मला निशांतसाठी चॉकलेट घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हा दोघांसाठी.." तिने छान हसुन विचारल. मी तिला नकार नाही देऊ शकली. आणि आम्ही गेलो.. पण का कोण जाणे मला गरगरल्या सारख वाटत होतं... आम्ही क्रॉस करून गेलो आणि दुकानातून चॉकलेट घेतलं.. ती कॉल वर बोलत बसली आणि मी बाजूला उभी होते. बोलता बोलतास आम्ही रोड क्रॉस करत होते की मला चक्कर यायला लागली...


ती कॉलवर बोलत पुढे निघून गेली... आणि मी मागेच.
अचानक डोकं जड झालं आणि माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली... डोळे उघड-झाप करत असताना मला समोरून आलेल्या एका भरदार गाडीने मला उंच आकाशात उडवलं आणि ती निघून गेली... मी खाली कोसळले होते.. डोक्यातुन येणार रक्त.. रस्त्याभर पसरले होते.


झालेल्या घटनेने सगळे लोक जमले.. आजू बाजूचे, कॉलेजमधले... यासर्वात मला दिसली ती हर्षु.... खुनशी नजरेने हसत उभी असलेली... माझे डोळे कमी कमी होत बंद झाले आणि आजू-बाजुचा आवाज बंद झाला.... मी त्या रस्त्यावर निपचित पडले होते...



काय माहीत नियतीच्या मनात नक्की काय होत ते... तिने एक हात पुढे करत आनंद दिला.. आणि दुसऱ्या हाताने माझ्याकडुन तो काढून ही घेतला.....



to be continued......



(कथेचा हा पार्ट कसा वाटला नक्की सांगा. कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)

स्टेय ट्युन अँड हॅपी रीडिंग गाईज....