सणवाराला सकाळपासून चालेली जेवणाची लगबग पोटात कावळे जमा करतं…मिनिटामिनटाला आवंढे गिळणं चालू होतं…पण अजूनही तुम्ही भूकेच्या तटावर उभे राहत निमूटपणे सहनशक्तीशीं निकराची लढाई करत असता….कधी एकदा नैवदयाचं ताट देवापुढं ठेवलं जातयं, आणि तुम्ही जेवताय असं होऊन जातं…जीभेचं तातकळणं सुरु व्हायला लागतं…पण अजून अवकाश असतो… जेवणाच्या तयारीची लगबग सुरु होते एकदाची… तुम्ही स्वयंपाकघराच्या बाहेर उभे राहत नुसताच कानोसा घेत असता…. जसाजसा एकएक जिन्नस एकमेकांत घुसळत जातो, आगीचा धग अजून एकात एक मसाल्यांच्या चाललेल्या सरमिसळीला आपला-आपला रंग चढवत चाललेला असतो…आपल लक्ष कुठं दुसरीकडे लागतचं नसतं…. अजूनही कितीतरी वेळ आपलं आंवढ गिळणं चालू असतं… एकाएक वाफेला वाट मोकळी होते… आगीचे धग कमी होतात…