तोच चंद्रमा.. - 19

  • 4.6k
  • 1.8k

१९ पहिले पत्र एके दिवशी सकाळी उठलो तर फॅक्स आलेला.. चांद्रभारत सरकारचा. बाॅम्बच म्हणाना. तो ही माझ्या नावाने. इकडची सरकारी व्यवस्था थोडी वेगळी. त्यामुळे पत्र आलेले ते अगदी डिटेलमध्ये. पृथ्वीवरच्या सरकारांची पत्रे सरकारी भाषेत नि अगदी मोजक्या शब्दांत येतात. हे पत्र आपल्याकडे असते तर.. प्रति, श्री. अंबर श्रीराम राजपूत, विषय: पृथ्वीवर परत पाठवणे बाबत चांद्रभारत सरकारच्या आदेशानुसार आपणांस सरकार विरोधी कारवायांना अनुलक्षून आपणांस पृथ्वीवर परत का पाठवणेत येऊ नये या संबंधात सक्षम अधिकारी यांचेसमोर वरील पत्राचे दिनांकापासून दहा दिवसांत उत्तर देणेचे निर्देश वरील सरकार देत आहे. याची तातडीने अंमलबजावणी न झाल्यास आपणास पृथ्वीवर परत पाठवणेचे आदेश सक्षम