शेर (भाग 3)

(14)
  • 13k
  • 1
  • 5.4k

मागील भागावरून पुढे......." मी रविवारी जाणार आहे तिच्या कडे.. " शेखर ने शांत स्वरात सांगितले. त्याच्या स्वरात अजिबात घाई , हुरहूर नव्हती. काही ठरण्याच्या आधीच ढोल वाजवणे हे त्याच्या स्वभावात बसत नव्हते.." बरं, ठीक आहे... पण लागलेच तर मला सांग मी पण येईन.."" बाबा मी काही तिथे लग्नाची बोलणी करायला जातं नाही.. तिच्या मनाचा जरा अंदाज घेईन.. मग पुढे बघू..."" ह्म्म्म..."त्या नंतर पुढचे काही दिवस असेच गेले.. शनिवारी त्याने तिला फोन केला. उद्या तो येतोय हे कळवण्यासाठी. पण तिचा फोन लागतं नव्हता.. त्याने तीन चार वेळा प्रयत्न केला. पण नाही. फोन लागला नाही...असे कां व्हावे... तो विचार करू लागला.. तिला