तोच चंद्रमा.. - 20

(11)
  • 4.9k
  • 1
  • 1.7k

२० दुसरे पत्र पुढे दोन तीन दिवस असेच टेन्शन मध्ये गेले. आमच्या घराबाहेर नि ब्रुनीच्याही घराबाहेर पाळत ठेवत होते कुणी. ब्रुनी म्हणालेली, कर नाही तर डर कशाला .. त्यामुळे धीर येत होता. पण तिला पृथ्वीवरचे वास्तव ठाऊक नाही. इथे चोर सोडून संन्याशीही सुळावर चढवू शकतो आम्ही, सोयीचे असेल तर. त्यामुळे हे असेच होईल याची खात्री नव्हती. तशातच एकदा दुसरे पत्र अाले. पूर्ण तपशीलवार होते ते.. ते पत्र टायटन वरून आलेले. टायटनच्या दूतावासातून. होते इंग्लिश मध्येच. आणि पृथ्वीवासियांच्या वागणुकीचे विश्लेषण होते त्यात.. प्रिय अंबर राजपूत यांस, मूळ पृथ्वी निवासी आणि आता चंद्रावर स्थायिक असलेल्या आपणाबद्दलच्या सकारात्मक