मला काही सांगाचंय.... - ४० - ३

  • 7.8k
  • 4
  • 2.7k

४०. एक घाव आणखी - 3 अनिरुध्द आणि आर्यन यांनी मिळून सर्वांसाठी चहा बनवला , चहा पिल्यानंतर ते चौघे बाजूच्या खोलीत बसले , जे कुमारच्या जीवनात अचानक घडलं ते कल्पनेच्या दुनियेपासून कित्येक दूर होते , अजूनहि त्यांना डॉक्टरांनी सांगितले ते खरं वाटत नव्हतं . पण त्यांच्या मान्य किंवा अमान्य केल्याने वास्तव बदलणार नव्हतंच ... डॉक्टरांच्या बोलण्याने त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता , आज पहिल्यांदा चौघे एकाच जागी बसले असून तिथे शांतता पसरली , बोलायला जणू शब्द नाहीत की काय ? आर्यन ला मात्र ही शांतता जास्त वेळ रुचली नाही . " दोस्तहो , मला तर अजूनही डॉक्टरांनी सांगितलेले पटत नाही