Mala Kahi Sangachany - 40-3 books and stories free download online pdf in Marathi

मला काही सांगाचंय.... - ४० - ३

४०. एक घाव आणखी - 3

अनिरुध्द आणि आर्यन यांनी मिळून सर्वांसाठी चहा बनवला , चहा पिल्यानंतर ते चौघे बाजूच्या खोलीत बसले , जे कुमारच्या जीवनात अचानक घडलं ते कल्पनेच्या दुनियेपासून कित्येक दूर होते , अजूनहि त्यांना डॉक्टरांनी सांगितले ते खरं वाटत नव्हतं . पण त्यांच्या मान्य किंवा अमान्य केल्याने वास्तव बदलणार नव्हतंच ... डॉक्टरांच्या बोलण्याने त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता , आज पहिल्यांदा चौघे एकाच जागी बसले असून तिथे शांतता पसरली , बोलायला जणू शब्द नाहीत की काय ? आर्यन ला मात्र ही शांतता जास्त वेळ रुचली नाही . " दोस्तहो , मला तर अजूनही डॉक्टरांनी सांगितलेले पटत नाही , असं कसं काय होऊ शकतं ? "

अनिरुध्द , " मन मानत नाही पण डॉक्टर आपल्याशी का म्हणून खोटं बोलणार , आपल्याला मान्य असो किंव नसो वास्तविकता नाकारता येणार नाही ... "

सुजित , " तुझं म्हणणं बरोबर आहे , पण आपल्या कुमारसोबत अस का व्हावं ? अपघातातून तो बचावला तर नशिबानं हे भलतंच समोर वाढून ठेवलं पण का ? "

ऋतुराज , " आपण जे घडलं ते बदलू शकत नाही , तर विचार करत राहिलो तर आणखी प्रश्न पडतील आणि मन विचलित होईल ... "

ऋतुराजच्या अश्या बोलण्याने ते तिघे जरा वेळ त्याच्याकडे पाहतच राहिले , याक्षणी हे तत्वज्ञान तो का म्हणून सांगतोय हे त्यांना कळलं नाही आणि किंचित नाराजीचा स्वर करून , " ऋतुराज , तु हे काय बोलतो आहे ? "

ऋतुराज , " हे पहा , दोस्तहो , हि परिस्थिती लक्षात घेता आपण हे का झालं ? कसं झालं ? पुढे काय होणार ? नशिबाला दोष देत बसल्यापेक्षा या वेळी यावर मात करण्यासाठी काय उपाय करता येतील याचा विचार करायला हवा ... "

जरावेळ विचार केल्यावर त्यांना ऋतुराजचं म्हणणं पटलं , कि जे घडून गेलं ते का , कसं घडलं ? याचा कितीही वेळा विचार केला तरी जे घडून गेलं ते बदलायचं तर राहील नाही , केवळ वेळ तसाच वाया जाईल आणि मन आणखी दुःखी होईल ... म्हणून या परिस्थिती वर उपाय काय ? याचा विचार करूया अस ठरवून आर्यन आणि अनिरुध्द जेवणाची व्यवस्था करण्यास निघून गेले . ऋतुराज आज घरी यायला जमणार नाही आणि कुमारच्या घरी मुक्कामी राहणार आहे म्हणून त्याच्या घरी कळवायला हवं म्हणून फोन करून सांगण्यासाठी खोलीतून बाहेर पडला , सुजित एकटाच त्या खोलीत बसून काही उपाय मिळतो का याचा विचार करू लागला . खूप वेळ विचार केला पण काहीएक उपाय मिळत नाही असं त्याला समजून आलं , मनात बरेच विचार एकाचवेळी तांडव करू लागले तेव्हा तो बसल्या जागेवरून उठला आणि तीन चार पावलं टाकत समोरच्या भिंतीत कप्पे करून बनवलेल्या कपाट जवळ गेला , विचार करता करता त्याने नकळत एक रजिस्टर त्यातून बाहेर काढून उघडलं , ते कुमारचं रजिस्टर होतं आणि त्यावर सुंदर अश्या अक्षरात त्याच नाव लिहिलं होतं , पानाच्या सर्वांत वर ठळक अक्षरात लिहिलेलं " विद्या विनयेने शोभते " त्याने वाचलं , आशेचं किरण नजरेसमोर चमकले . तो पटकन खोलीतून बाहेर पडला आणि त्याला सुचलेली गोष्ट त्याने तिघांना सांगितली , सर्वांना ती कल्पना आवडली , सुजितला हे आधीच सुचायला हवं होतं असेही अनिरुध्द म्हणाला . या बिकट परिस्थितीतून कुमारला बाहेर काढायचं आहे तर सुरुवात येथूनच करायला हवी , याची त्यांना जाणीव झाली आणि जरी अशक्य वाटत असले तरी सध्या हाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे म्हणून अस करायचं सर्वांनी ठरवलं .. " मी ना खरंच खूप मोठा विसरभोळा आहे , इतकी महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात कशी आली नाही , मी हे कसं काय विसरलो ? जास्त वेळ वाया जाण्याआधी मला आठवलं हे एक बरं झालं ... आता आधी तिला फोन केला पाहिजे . " सुजित हळूच पुटपुटला आणि मोबाईल बाहेर काढून त्याने तिला फोन केला ...

" हॅलो , मी सुजित ... मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे ... "

" हं बोल , पण आता यावेळी ? कुमार ठीक तर आहे ना ? "

" पहिलं म्हणजे कुमार तसा ठीक आहे पण एक भलतीच थट्टा नशिबानं आपल्या सर्वांशी केली , खास करून कुमारशी ... "

" असं कोड्यात बोलू नकोस , काय झालं ? ते स्पष्ट सांग बरं .. "

" जवळपास ६ वाजता , डॉक्टरांनी कुमारला तपासलं तेव्हा तो त्यांच्याशी बोलला आणि डॉक्टरांना त्याचा आजार समजला , कुमारने डॉक्टरांना विचारलं की ' मी कुठे आहे , तुम्ही कोण आहे ? ' त्यावर डॉक्टरांनी , ' तुझा अपघात झाला आणि तुझं ऑपरेशन केलं ... ' असं सांगितल्यावर तो काहीही बोलला नाही , अस डॉक्टर म्हणाले होते , डॉक्टरांनी जेव्हा परत त्याला विचारलं की ' कुमार , आता तुला कसं वाटत आहे ? '

continue...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED