अघटीत - भाग-१

(28)
  • 35.5k
  • 1
  • 23.3k

अघटीत भाग १ पद्मनाभची गाडी पोर्चमध्ये शिरली तेच ताबडतोब दोन पोलीस समोर आले आणि त्यांनी गाडीचे दार उघडले . पद्मनाभ त्याची आई ,पत्नी वरदा आणि लेक क्षिप्रा गाडीतुन खाली उतरले आणि बंगल्यात शिरले .त्या “टुमदार” बंगल्यात दोन नोकर ,एक माळी आणि एक कुक त्यांच्या स्वागतासाठी हजर होते . सातार्यातील पोस्टिंग नंतर डी एस पी च्या प्रमोशन वर पद्मनाभ ची बदली नुकतीच पुण्यात झाली होती .आपल्या अंगभूत गुण आणि सचोटी याच्यावर त्याला अत्यंत लहान वयात हे प्रमोशन मिळाले होते .अत्यंत अभिमानास्पद अशी कारकीर्द होती पद्मनाभची .तसे त्याचे वडील पोलीस सेवेतच होते पण त्यांना इतके मोठे प्रमोशन त्यांच्या हयातीत मिळाले