निसटणं आणि टिकणं

  • 5.6k
  • 1.9k

तलावाच्या शहरातल्या तलावापैकी हा एक तलाव, अगदीच छोटेखानी, त्यांचे खोलवरचे सगळे पाण्याचे झरे विरत चालेले, हल्लीच तलावाच्यावरुन एका उडडाणपूलाचं बांधकाम झाल्यापासून तर तिथल्या पाण्यात सूर्यकिरणं यायला वावच राहिला नव्हता, या असल्या वातावरणात तिथं तंग धरु शकतील असे वनस्पतीजीव, जलचराचं मात्र यामुळे फारच हाल होतं होते. इथं अस्तित्वच टिकुन न राहण्याची परिस्थिती उत्पन्न होऊन बसली होती आणि या सगळयात शहरात माजलेला अस्वच्छतेपणाचा कहर या पाण्यालासुदधा लागू होत होता, कारण काही निलाजरे लोक या तलावाच्या शेजाराच्या कचराकुंडीत कचरा टाकायच्याऐवजी सरळ या तलावात कचरा टाकत सुटत…… उच्छाद मांडला होता नुसता…… आणि त्यात भरीस भर म्हणून तलावाला लागून असलेल्या मोठाल्या झाडाची सुकलेली पानं सरळ