रोशनीला दारात उभे पाहुन जोसेफने चेहर्यावर उसने आश्चर्य आणले. “मॅम!!!… तुम्ही.. इथे??”“काय झालं मि.जोसेफ?”“काही नाही मॅम, परवा घरी परतायला उशीर झाला होता, येताना गाडी पंक्चर झाली.. झाली काय, केली गेली. वाटेत खिळे टाकुन ठेवले होते. मी उतरुन चाक बदलतच होतो तेवढ्यात बाजुच्या झाडीतुन चार-पाच भुरटे चोर आले आणि त्यांनी मला मारहाण केली..”“पोलीस कंम्प्लेंट केलीत मि.जोसेफ?”“नाही मॅम, तसे फार काही चोरीला नाही गेले..”“अहो पण.. एक मिनीट..” असे म्हणुन रोशनीने पर्समधुन मोबाईल काढला.. “मी ए.सी.पींना फोन लावते आहे, दे बेटर शुड लुक इन्टु इट..” आणि ती नंबर फिरवु लागली.. “इट्स ओके मॅम.. तसेही त्या चोरट्यांनी चेहर्यावर काळे बुरखे घातले होते, त्यांचे चेहरे