माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 3

(14)
  • 8.2k
  • 5k

३ परिचयाचा इंट्रो एकेकाच्या काय सवयी असतात नाही? आपल्या सवयी ही नंतर सवयीने सवयीच्या होऊन जातात! हे माझे एक जनरल आॅब्झर्व्हेशन.. आणि काही नाही! तर माझी ही सवयच आहे.. माझ्या सवयीचा परिचय करून द्यायलाच हवा.. तर हीच ती सवय.. परिचय अर्थात इंट्रोडक्शन. म्हणजे लहानपणी निबंध लिहिताना माझी इंट्रोच मूळ मुद्द्याहून मोठी असायची. इंट्रो म्हणजे परिचय! मूळ विषयास येण्याआधी नमनास घडाभर तेल. पामोलिन नाही अगदी ऑलिव्ह ऑईल.. बोलाच्याच तेलात कशाला हवी कंजूसी.. घाला अगदी महागडे शेरभर ऑलिव्ह ऑईल आणि काय! पण ही लांबलचक इंट्रोची सवय इतकी महाग पडेलसे वाटले नव्हते. म्हणजे झाले असे होते की निबंधात माझी परिचयात्मक माहितीच