MAZYA LOVEMARRIAGECHI STORY book and story is written by Nitin More in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. MAZYA LOVEMARRIAGECHI STORY is also popular in प्रेम कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - कादंबरी
Nitin More
द्वारा
मराठी प्रेम कथा
१ सुरुवात! कुठल्यातरी हिंदी सिनेमात एकदा पाहिले, म्हणजे ऐकले होते.. दुसऱ्या कुणाच्या लग्नात अजून कुणाची लग्नं जमत असतात म्हणे! .. म्हणजे तिकडे बोहल्यावर पद्धतशीर लग्न सुरू असते.. नवरानवरी बोहोल्यावर हाती माळा घेऊन सलज्ज वगैरे उभे असतात. भटजीबुवा पुढच्या आयुष्यातील तारांबळ कळावी म्हणून चंद्रबलं आणि ताराबलं वगैरे घसा फोडून गात असतात.. नि इकडे कुणी होतकरू आयुष्यातले ते एकमेव ध्येय असल्यासारखा आपली लाइन जमवण्याच्या मागे लागलेला असतो. त्यात किती चूक की किती बरोबर हे नाही करायचे, पण एक आपले जनरल आॅब्झर्वेशन माझे. अजून एक निरीक्षण आहे माझे.. म्हणजे बघा हां.. आपल्याकडच्या लग्नांची ही एक गंमत असते. आपण मारे लगीनघाई वगैरे
१ सुरुवात! कुठल्यातरी हिंदी सिनेमात एकदा पाहिले, म्हणजे ऐकले होते.. दुसऱ्या कुणाच्या लग्नात अजून कुणाची लग्नं जमत असतात म्हणे! .. म्हणजे तिकडे बोहल्यावर पद्धतशीर लग्न सुरू असते.. नवरानवरी बोहोल्यावर हाती माळा घेऊन सलज्ज वगैरे ...अजून वाचाअसतात. भटजीबुवा पुढच्या आयुष्यातील तारांबळ कळावी म्हणून चंद्रबलं आणि ताराबलं वगैरे घसा फोडून गात असतात.. नि इकडे कुणी होतकरू आयुष्यातले ते एकमेव ध्येय असल्यासारखा आपली लाइन जमवण्याच्या मागे लागलेला असतो. त्यात किती चूक की किती बरोबर हे नाही करायचे, पण एक आपले जनरल आॅब्झर्वेशन माझे. अजून एक निरीक्षण आहे माझे.. म्हणजे बघा हां.. आपल्याकडच्या लग्नांची ही एक गंमत असते. आपण मारे लगीनघाई वगैरे
२ योगायोगाची सुरुवात योगायोगाने! देव आपल्याला नातेवाईक का देतो? कुणी काहीबाही उत्तरे देईल याची. पण माझे उत्तर मात्र ठरले आहे. त्या लग्नगाठी विधात्याने ठरवल्याप्रमाणे बांधल्या जायला हव्या असतील तर अशा नातेवाईकांना पर्याय नसावा! अर्थात हे माझे फक्त ...अजून वाचाआलेले बोल आहेत. नातेवाईक, मग त्यांची मुलं, तुमचे भाऊ नि बहिण, त्यांची लग्नं, नि त्यातून निर्माण होणाऱ्या संधी .. म्हणजे माझ्या बाबतीत तरी झाले ते असे झाले. नाहीतर मी एकुलता. ना सख्खा भाऊ ना बहीण मला. पण चुलत नि मामे दोन्ही प्रकारच्या बहिणी मात्र आहेत मला. आणि माझ्याच या स्टोरीसाठी त्यांची योजना आहे की काय असा संशय तुम्हाला ही येईल माझी गोष्ट
३ परिचयाचा इंट्रो एकेकाच्या काय सवयी असतात नाही? आपल्या सवयी ही नंतर सवयीने सवयीच्या होऊन जातात! हे माझे एक जनरल आॅब्झर्व्हेशन.. आणि काही नाही! तर माझी ही सवयच आहे.. माझ्या सवयीचा परिचय करून द्यायलाच हवा.. ...अजून वाचाहीच ती सवय.. परिचय अर्थात इंट्रोडक्शन. म्हणजे लहानपणी निबंध लिहिताना माझी इंट्रोच मूळ मुद्द्याहून मोठी असायची. इंट्रो म्हणजे परिचय! मूळ विषयास येण्याआधी नमनास घडाभर तेल. पामोलिन नाही अगदी ऑलिव्ह ऑईल.. बोलाच्याच तेलात कशाला हवी कंजूसी.. घाला अगदी महागडे शेरभर ऑलिव्ह ऑईल आणि काय! पण ही लांबलचक इंट्रोची सवय इतकी महाग पडेलसे वाटले नव्हते. म्हणजे झाले असे होते की निबंधात माझी परिचयात्मक माहितीच
४ नक्षत्राचे दर्शन तर मु.पो.काकाचे घर! हा काका म्हणजे दिन्या काका. माझ्या बाबांहून लहान. आम्ही त्याला एकेरीतच हाक मारायचो. दिन्या काका तसा लहान भाऊ असला तरी शिस्तीचा कडक. काकू म्हणजे रमाकाकू त्याच्याच सारखी. कडकलक्ष्मी! अर्थात ...अजून वाचातसे प्रेमळ होते. पण कर्मठ होते. आमच्या घरी बाबा असे नव्हते. देवधर्म वगैरे जेवढ्यास तेवढे. आई पण तशी धार्मिक नव्हती. पण काका मात्र अत्यंत काटेकोरपणे सारे देवधर्म पाळे आणि त्यातली चूक त्याला खपत नसे. त्यामुळे त्याच्या घरी मला त्याच्या शिस्तीचे टेन्शन असे. त्या शिस्तीच्या चिखलात माझ्या प्रेमकहाणीचे कमळ त्यामुळे अगदी उठून दिसते मला तरी आज मागे वळून पाहताना. काकाचे घर मोठे असले
५ धागे आणि दोरे लुंगीत मी लुंगासुंगा वाटलो असेन का तिला? असेल.. जे व्हायचे ते होऊन गेलेले. त्यात करण्यासारखे आता काही नव्हते. आता फक्त स्मार्ट होणे आवश्यक. मी पटकन वर जाऊन कपडे बदलले. होता होईल ...अजून वाचास्मार्ट झालो नि बाहेर आलो. पण मी बाहेर येईतोवर नक्षत्रा निघून गेलेली. म्हणजे दरवाजा बाहेरच्या चपला नाहीशा झालेल्या. परत त्या येतील की नाही कुणास ठाऊक. आता करावे तर काय करावे? मी वाचलेली सारी डिटेक्टिव्ह पुस्तके मनात जागी झाली. माहिती काढण्याच्या पद्धती असतात. माहिती देणाऱ्यास आपण माहिती देत आहोत हेच माहिती नसावे अशा काही! एखादा डिटेक्टिव्ह धनंजय जणू संचारला माझ्यात. आता आईकडूनच मिळतील