पत्र - लाडक्या पावसासाठी

  • 6.1k
  • 1
  • 2k

प्रिय पाऊस..,कसा आहेस. खुप दिवसांपासून इच्छा होती कि तुला एक पत्र लिहायचं. पत्र तेव्हा लिहितात जेव्हा आपण आपल्या भावना एखाद्या समोर व्यक्त करू शकत नाही. त्यावेळी हे पत्र आपल्या कामी येत. मला ही तुझ्याकडे काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. एका मित्राकडे करतात ना अगदी तशाच. माझ्या कोणत्याही बोलण्याने तुला काही वाईट वाटलं तर समजून घे हा मला. म्हणुन आधीच बिग सॉरी माझ्या लाडक्या पावसा. चला मग पत्र सुरु करते. आधी मला ना तुझा खुप कंटाळा यायचा, सॉरी हा. पण माणसाने कधी कधी खरं बोलावं. कंटाळा कशाचा तर होणाऱ्या चिखलाचा. काय व्हायचं, मी शाळेत जायची ना तेव्हा त्या चपलांमुळे सगळा चिखल माझ्या