बारा जोतिर्लिंग भाग १५

  • 4.9k
  • 2
  • 1.8k

बारा जोतिर्लिंग भाग १५ केदारनाथच्या माहितीसोबत तेथे २०१३ साली आलेल्या भयंकर आपत्ती बाबत माहिती घेणे संयुक्तिक ठरेल . २०१३ मध्ये केदारनाथ समवेत उत्तराखंड मध्ये आलेले हे संकट हिमालयाच्या इतिहासात सर्वात भयानक म्हणावी लागेल . ही प्राकृतिक आपत्ती कशामुळे आली हे कोणालाच त्यावेळी समजु शकले नाही . बरेचसे कयास केले गेले पण नक्की कारण समजुन आलेच नाही . अगदी त्यावेळेस उपस्थित असेलेले प्रत्यक्षदर्शी लोक असोत अथवा देशातले नामवंत इतिहासकार, वैज्ञानिक, भूगर्भशास्त्री किंवा आपत्तीविशेषज्ञ सुद्धा त्याचा बारकाईने अभ्यास करून देखील एका विशिष्ट कारणा पर्यंत पोचू शकलेले नाहीत . त्या वेळेस केदारनाथच नव्हे तर नदीच्या प्रवाहासोबत पुढे ढकलल्या जाणाऱ्या रामबाड़ा, गौरीकुंड, सोनप्रयाग, चंद्रापुरी,