ओजसचा वाढदिवस

  • 15.2k
  • 4.9k

उद्धव भयवाळ औरंगाबाद ओजसचा वाढदिवस आज सकाळपासून ओजस खूपच खुशीत होता. त्याला कारणही तसंच होतं. आज ओजसचा वाढदिवस होता. कालच ओजसने त्याच्या बाबांसोबत जाऊन वाढदिवसासाठी आवश्यक त्या साऱ्या वस्तू मार्केटमधून आणल्या होत्या. त्या वस्तूंची यादी ओजस मागील चार दिवसांपासून करीत होता. समोरच्या हॉलमध्ये लावण्यासाठी फुगे, त्यात टाकण्यासाठी चॉकलेट्स, वाढदिवसाला येणाऱ्या त्याच्या मित्रांना देण्यासाठी रिटर्न गिफ्ट्स इत्यादी वस्तूंची यादी त्याने परवाच बाबांकडे दिली होती. कालच सगळ्या वस्तू आणून झाल्या होत्या. वाढदिवसासाठी ओजसच्या आवडीच्या गुलाबी रंगाच्या केकची ऑर्डरही देऊन झाली होती. आज सायंकाळी सात वाजता ओजसचा वाढदिवस साजरा होणार होता. त्याच्या अर्धा तास अगोदर केक आणण्यासाठी