चेंडू

  • 11.8k
  • 2.6k

चेंडू परवा अडगळीच्या खोलीमधील खेळणी काढताना तीन- चार चेंडू सापडले . काही प्लास्टिकचे. काही रबरी. त्यांच्या कडे पाहून बालपण आठवलं.आयुष्यात चेंडूबरोबर खेळला नाही असा माणूस भेटणं थोडं मुश्किलच. माझी आजी गोधडी शिवायची.जुनी कपडे ती वापरत असे. ती जुन्या कपड्यांचे काठ, चड्डीच्या नाड़या , फाटके सुरकुतलेले कपडे गोळा करुन बाजूला ठेवायची . ते एकत्र करुन एका कपड्यात बांधायचे व त्याला गोल आकार देऊन आजी त्याला दोन- चार टाके घालायची आणि चेंडू तयार व्हायचा.तो आमच्या आयुष्यातील पहिला चेंडू. तो चेंडू लगोरी, क्रिकेट, फेकाफेकी, पकडा-पकडी अशा खेळात वापरला जायचा. त्यादिवशी मला आईनं