कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन - भाग-३

  • 9.6k
  • 2
  • 4.8k

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग- ३ –रा ---------------------------------------------------------------------- नमस्कार , मी सरिता , मिसेस सरिता सागर देशमुख , सुप्रसिध्द उद्योजक श्री.सागर देशमुख यांची पत्नी “, ही माझी एकमेव ओळख आहे. याशिवाय माझी काही एक ओळख आता शिल्लक उरलेली नाही ,आणि काही खाणाखुणा उरल्याच असतील तर , सागर लगेच त्या खाणाखुणा अगदी नष्ट करून टाकण्यासाठी तत्पर असतो आणि त्याला वेळ नसेल तर .. त्याने सतत माझ्या भवती ठेवलेली त्याची विश्वासू माणसे ही अशी कामे अगदी आज्ञाधारकपणे करीत असतात , न करून ते तरी काय करतील बिचारे “, त्यांना पगार मिळतो तो फक्त याच कारणासाठी . त्यांचे सर -सागर देशमुख यांच्या