फुगेवाला मुलगा

  • 29.6k
  • 8.1k

उद्धव भयवाळ औरंगाबाद फुगेवाला मुलगा बालमित्रांनो, एक होता विजू. अगदी तुमच्याच वयाचा. गावातील जि.प.च्या शाळेत सहाव्या इयत्तेत शिकत होता. विजूचे आई वडील खूप गरीब होते. विजूच्या वडिलांकडे एक जुनी शिलाई मशीन होती. अनेक वर्षांपासून ते आपल्या छोट्याशा घरातच पुढच्या खोलीमध्ये त्या मशीनवर लोकांचे कपडे शिवून देत आणि उदरनिर्वाह करीत. विजूची आईसुद्धा चार घरची कामे करून संसाराला हातभार लावीत होती. विजूने खूप अभ्यास करावा, खूप शिकावे, मोठे व्हावे आणि आपल्याला म्हातारपणी सुख द्यावे असे त्या दोघांनाही वाटत असे. परंतु विजूला असे काहीच वाटत नसे. त्याला खेळात जास्त रस होता. अभ्यास नकोसा वाटे. शाळेतून घरी आला की सरळ खेळायला