बक्षीस

  • 21.3k
  • 1
  • 6.8k

उद्धव भयवाळ औरंगाबाद बक्षीस मालनबाई दिवसभर लोकांच्या घरची धुणीभांडी करून थोड्या वेळेपूर्वीच घरी आल्या होत्या अन् घरातले आवरू लागल्या होत्या. तितक्यात त्यांचा मुलगा सुरेश शाळेतून घरी आला आणि आईच्या जवळ जाऊन आईला म्हणाला, "आई, एक आनंदाची बातमी सांगणार आहे मी तुला आज." "अरे वा! कुठली बातमी? शाळेत काही विशेष घडलंय का आज?" मालनबाईंनी सुरेशला जवळ घेऊन विचारले. " हो, तसं विशेषच आहे. पुढच्या पंधरवड्यात आमच्या शाळेत एक निबंध स्पर्धा होणार आहे. निबंधासाठी विषयाचं बंधन नाही. पण स्पर्धेमध्ये पहिल्या तीन क्रमांकांना बक्षीस मिळणार आहे. पन्नास ओळींपर्यंत निबंध घरून लिहून न्यायचा आहे." सुरेश म्हणाला. " अरे,