"अग आई.., लवकर दे ग चहा, मला उशीर होतोय ऑफिससाठी." "हो हो देतेय ग. हा घे चहा आणि तुझा टिफिन." ही मनस्वी सावंत. साधी सरळ आणि मध्यम वर्गीय मुलगी. मनस्वी दिसायला सावळी, पण तेवढीच सुंदर.., ते बोलतात ना सावळ्या मुली जरा जास्तच रेखीव असतात. तिचे बदामी डोळे आणि त्या नजरेत एक वेगळीच जादु होती. तिच्या बोलण्यात नेहमी दिसणारा आत्मविश्वास लोकांना भुरळ पडायचा. कमी बोलणंच ती पसंद करायची. पण एकदा काय एखाद्याला आपलस केल की, दिलखुलास बडबड करणारी. कुरळे काळेभोर लांबसडक केस. नेहमी हसुन बोलणारी अशी ही मनस्वी. घरात आई बाबा आणि दोन बहिणी. एक मोठी आणि एक लहान. अस साध