मेड फॉर इच अदर - १ Hemangi Sawant द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मेड फॉर इच अदर - १

"अग आई.., लवकर दे ग चहा, मला उशीर होतोय ऑफिससाठी." "हो हो देतेय ग. हा घे चहा आणि तुझा टिफिन."

ही मनस्वी सावंत. साधी सरळ आणि मध्यम वर्गीय मुलगी. मनस्वी दिसायला सावळी, पण तेवढीच सुंदर.., ते बोलतात ना सावळ्या मुली जरा जास्तच रेखीव असतात. तिचे बदामी डोळे आणि त्या नजरेत एक वेगळीच जादु होती. तिच्या बोलण्यात नेहमी दिसणारा आत्मविश्वास लोकांना भुरळ पडायचा. कमी बोलणंच ती पसंद करायची. पण एकदा काय एखाद्याला आपलस केल की, दिलखुलास बडबड करणारी. कुरळे काळेभोर लांबसडक केस. नेहमी हसुन बोलणारी अशी ही मनस्वी. घरात आई बाबा आणि दोन बहिणी. एक मोठी आणि एक लहान. अस साध सरळ मध्यम वर्गीय कुटुंब.

मनस्वीला नुकतीच नवीन ठिकाणी नोकरी लागलेली आणि तिकडेच जायची तिची तय्यारी चालु होती. सर्व तय्यारी करून निघाली एकदाची. ट्रेन पकडुन कळवा गाठला आणि ऑफिकमध्ये पोहोचली. नवीन ऑफिस नवीन माणस. सगळ कस नवीन होत तिच्यासाठी तसा आधी जॉब केलेला, पण दुसऱ्या ठिकाणी कस सगळंच नवीन असत ना.




तिची पहिली ओळख झाली ती आमीर सोबत. लंच टाइम झाला आणि त्याने तिला सोबत जेवायला बोलावत सर्वांशी ओळख करून दिली. "मनस्वी.., या प्राची मॅम इथे खुप वर्षांपासून काम करत आहेत. आणि या लक्ष्मी मॅम. हा आपला विकास, हा आनंद आणि अजून एक आहे. पण आज सुट्टी वर आहेत महाशय. तो आला की भेट होईलच." छान गप्पा गोष्टी करत लंच टाइम संपला. मग सगळे परत कामाला लागले. काम करता करता वेळ कसा संपला तिला आज कळलच नाही. पहिला दिवस छान गेला होता. ऑफिस सुटलं तशी ती निघाली घरी जायला सर्वांना बाय करुन.



मनस्वी घरी आली फ्रेश झाली. तसा आईने फक्कड चहाचा कप आणुन दिला. "ऐ आई.., तुझ्या हाताचा हा एक कप चहा मस्त फ्रेश करतो." अस बोलत आई आणि लहान बहिणी सोबत गप्पा मारून तिने आईला थोडी जेवणात मदत केली. मोठी बहीण आल्यावर सर्वांनी जेवण आवरलं. थकल्यामुळे आणि परत उद्या ऑफिस असल्याने ती झोपी गेली. सकाळच्या आईच्या हाकेने सकाळ झाली. थोडा उशीर झाला म्हणुन धावपळ करत पोहोचली एकदाची ऑफिसला. तो दिवस होता २६ जानेवारी त्यांची झालेली पहिली भेट.



मानस परब. दिसायला एकदम डॅशिंग असा. नावाप्रमाणेच होता मानस. मन-मिळावु, सर्वांशी हसून खेळून वागणारा. मनाने हळवा होता. कधी कोणाशी भांडण करायला त्याला मुळीच आवडायच नाही. जरी कोणी दुखी वाटलंच तर स्वतः समोरच्याला हसवायचा. नेहमी समोरच्याला हॅपी करणारा असा मानस होता. तो नेहमी बोलायचा "माझ्यामुळे कधी कोणाला त्रास झालेला मला आवडणार नाही." असा हा माणसांची जाणीव ठेवणारा मानस.



त्या दिवशी आमीर काही कारणाने चार-पाच दिवसांसाठी गावी गेलेला. तिला आज एकट-एकट वाटत होत. आज मानस आलेला आणि सर्वांशी बोलण्यात जरा बिझी होता. तिने मानसला बघितल आणि त्याचीही नजर तिच्याकडे गेली त्याने लगेच स्वतःची मान दुसरीकडे करत सर्वांशी बोलण सुरूच ठेवल. अस अचानकपणे झाल्याने तिला तो जरा खडूसच वाटला. आपण किती लगेच समोरच्या वेक्तीला जज करतो ना.., असो.....



बाजुचा लँडलाईन वाजला आणि ती सरांच्या केबिनमध्ये निघुन गेली. सरानी तिला क्लायंटला भेटायला पाठवलं होत. आणि ती गेली. परत आली तेव्हा तिचा मूड जरा खराबच होता. त्यात भर म्हणून की काय एकाचा राग दुसऱ्यावर निघाला..मानस मस्करीत बोलायला आला आणि हिने क्लायंटचा राग मानसवर काढला.. त्यात ही उपाशी मग काय अजूनच तापलेली. बिचारीने टिफिन उघडला तर कोबीची भाजी खराब झालेली आणि चपात्याना मुंग्या लागलेल्या. आधीच वाईट मूड त्यात भूक लागलेली आणि त्यात हे अस जेवण खराब होण. अजून भर म्हणून की काय मानस तिला चिडवत होता. शेवटी कंटाळून तिने सरांकडे हाफ डे मागितला आणि घरी निघून गेली.

To be continued