मेड फॉर इच अदर - २ Hemangi Sawant द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मेड फॉर इच अदर - २

"मानस तू चुकीचा वागलास आज मला नाही पटल तुझं वागणं..," प्राची मॅम मानस वर ओरडल्या. "अहो मॅम.., मी फक्त गंमत केली माझा हेतू तिला दुखवायचा मुळीच नव्हता." "हो पण आज जे झाल ते नाही व्हायला हव होत मनस्वी नवीन आहे आणि तुझ्या मस्करीची सवय तिला नाहीये. चल तिला कॉल कर आणि सॉरी बोलून माफी माग तिची कळल का..?? उद्या आल्या वर तुमच्यात मला मैत्री हवी कळल का." त्यांनी त्यांचं बुण संपवलं. "हो मॅम." मानस ही मान खाली घालून गप्पपणे उभा होता. तो निघत होता की, प्राची मॅम बोलल्या, "नंबर नको का हा घे तिचा नंबर आणि उद्या येताना सगळं सोल्व्ह करा..." त्यांनी नंबर देत एक स्माईल दिली आणि त्या निघून गेल्या. थोड्यावेळाने तो ही निघाला.


त्याने तिचा नंबर लावला.."ही कॉल का रिसिव्ह करत नाहीये." खुपदा कॉल करून ही ती घेत नव्हती म्हणुन त्याने मॅसेज टाकायचा विचार केला. "जाऊदे मी मॅसेज टाकतो सॉरीचा."
"हेय...मानस हिअर, सॉरी फॉर व्हाट आय डिड टुडे.. आय डोन्ट वॉन्ट टु हर्ट यु. प्लीज फॉरगिव मी." मेसेज करून तो तिच्या रिप्लायची वाट बघत बसला. थोड्याच वेळाने तिचा रिप्लाय आला. "हेय.. मनस्वी हिअर, इस्ट ओके. डोन्ट डु धिस अगेन." त्यांनतर मात्र त्यांची छान मैत्री झाली.



छान गप्पा रंगल्या होत्या त्यांच्या. "वेल., उद्या भेटुया का जाताना तु कोणत्या ट्रेन ने जातेस..?" अस मानस ने तिला विचारले... "मी ८.१० ची ट्रेन पकडते आणि तु..?" "मी पण त्या आधीची पकडतो.., सो उद्या एकत्र जाऊया का..?? म्हणजे जमेल का तुला..? म्हणजे तुला प्रॉब्लेम नसेल तर." तिने थोडा विचार करून होकार कळवला. दोघांनी एकमेकांना गुड नाईट विश करून निद्रेच्या स्वाधीन झाले.



आज मानस लवकर उठुन तय्यारी करून निघाला होता. आज त्याला लवकर पोहोचायचे होते. ट्रेन पकडून तो ठाण्याला तिची वाट बघत बसलेला. मनस्वी ही बरोबर ८.१० ला ठाण्यात पोहोचली.
"हॅलो गुड मॉर्निंग.." मानसने तिला विश केल. "गुड मॉर्निंग" तिनेही हसुन रिप्लाय केला. आणि त्यांनी एकत्र दुसरी ट्रेन पकडली. "बाय द वे.., मी माझी ओळख करून दिलीच नाही.. मी मानस.., इथे एक वर्षांपासून काम करतोय. आणि हो कालसाठी परत एकदा मनापासून सॉरी. मला तुम्हाला हर्ट नव्हता करायच." "इट्स ओके किती वेळा सॉरी बोलशील.., बाय द वे अरे तू रे चालेल मला." तिने हसुन सांगितलं. "मी मनस्वी नवीन जॉईन झालेय कालच. तुम्ही नव्हता काल." "तुला ही तोच रुल बर का.." या वर दोघेही मन मुराद हसले. "हो काल सुट्टी वर होतो." मानस हात पुढे करत बोलला 'फ्रीन्ड्स' तिनेही आपला हात पुढे करत त्याची मैत्री स्विकारली. दोघेही ऑफिसला पोहोचले बघतात तर काय आज आमिर आलेला. मानस जाऊन आमिरला भेटला, मनस्वी ही भेटली. यांची आता छान मैत्री झाली होती. तीन घट्ट मित्र.



तिघेही रोज लवकर यायचे आणि बडबड, मस्ती करत बसायचे. छान मैत्री झालेलीना ना यांची. काम करता करता अचानक लाईट गेली पूर्ण ऑफिसातील कर्मचारी बसून गप्पा मारत होते. त्यांचे सर देखील त्यांच्यात मिक्स होऊन गप्पा गोष्टी करत होते. गप्पा छान रंगल्या होत्या, पण लाईट काही येईना. शेवटी सरानी सर्वांनी हाफ डे देऊन टाकला. लवकर जायचा तिघांना कंटाळा आलेला. म्हणुन मग तिघांनी बाहेर फिरायला जायचा प्लॅन केला.


"पण जायचं कुठे..??" मानस ने विचारला. "तुम्हीच सांगा." मनस्वीने आपले हात वर करत मला काही म्हाहित नाही तुम्हीच ठरवा अस सांगून टाकल. मग आमिर पूढे येऊन बोलला.., "चला कर्नाळा फोर्टला जाऊया." तिघेही तय्यार झाले. ट्रेन पकडून पुढे शेअर गाडीनेते कर्नाळा फोर्टला पोहोचले खरे.., पण उन्हाळा असल्याने चांगलेच थकले होते.


To be continued