Made for each other - 6 books and stories free download online pdf in Marathi

मेड फॉर इच अदर - ६

"काय मॅडम उद्याचा काय प्लॅन...?" "माझा कसला प्लॅन मी बाबा तु सांगशील ते ऐकेल." "बघ हा मी नेईल तिकडे याव लागेल तुला चालेल का..?" त्याने डोळा मारत विचारल. तिने मानेनेच होकार दिला. "तुझ्यासोबत कुठेही यायला मी नेहमीच तय्यार आहे." ती ही काही हमी नव्हती. "बर बर उद्या सकाळी लवकर तय्यारी करून रहा घ्यायला येतो स्टेशन ला." "ओके डन."


रात्री कॉल करून त्याने तिला विश केला. थोड बोलून उद्या भेटायचं ठरवुन त्यांनी कॉल कट केले. तिला तर झोपच लागत नव्हती. उद्या मानस काय सरप्राईज देईल याने तिच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. कुस बदलत शेवटी ती निद्रेच्या स्वाधीन झाली."आई चल निघते हा मी यायला जरा उशीर होईल." ती निघताना बोलली. "हो पण नीट जावा दोघे आणि काळजी घ्या." "हो ग आई घेतो चल बाय." घाई करत ती स्टेशनला पोहोचली. तो आधीच येऊन तिची वाट बघत होता. त्याने तिला बघितल आणि तो बघतच राहिला.मनस्वी आज कमालीची सुंदर दिसत होती. ते कुरळे काळेभोर केस स्टेशनवरच्या पंख्याच्या हवेत उडत होते. बदामी डोळ्याला एक काजलाची हलकी रेख ओढली होती. स्काय-ब्लू आणि राणी कलर चा चुडीदार ड्रेस तिच्या सौंदर्यात अजूनच भर पडत होता. मानस तिला बघतच राहिला. ती जवळ येऊन तिनेच त्याला, जरासं हलवतच हाताने "काय..!" अस विचारले. "काही नाही ग आज खुप छान दिसते आहेस तु." तिने लाजत हो का थँक्स म्हटलं. परत एकदा विश करत ते निघाले. "मानस जायच कुठे आहे आपण." "आपण आधी स्टुडिओमध्ये जात आहोत. आपला छान फोटो काढुया मग जायच आहे कुठे तरी.. ते सरप्राईज आहे हा विचारू नकोस गप्प पणे चालायचं मागे मागे कळल ना.." "बर बाबा चला."त्यांनी छान फोटो काढला आणि निघाले. ट्रेन चा प्रवास करून ते त्याच्या घराच्या इथे पोहोचले, आणि त्याने तिला सांगितल की, आपण माझ्या घराच्या इथे पोहोचलो आहोत. "म्हणजे आज आपण तुझ्या घरी जातोय." तिने आश्चर्याने पाहिलं. हसत मानस तिला आत घरात घेऊन गेला. "आई बघ आपल्याकडे कोण आलय..!!"त्याची आई किचनमधून आली त्यांना जरा धक्काच बसला. "अरे बंडू सांगायच ना आज घेऊन येणार होतास ते काही केलं नाहीये मी जेवण आता घाई होईल सगळी तू पण ना.."
ती आत जाताच ती त्यांच्या पाया पडली. "अहो आई चालेल एवढ काही नाही. या तुम्ही आपण छान गप्पा मारुया." काही वेळातच दोघांची चांगली गट्टी जमली. मग मानस आणि मनस्वी ने मिळून स्वयंपाक केला. पनीरची भाजी, भात आणि डाळ. गोड म्हणुन श्रीखंड आणलेल. चला जेवुन घेऊया.सर्वजण जेवायला बसले. जेवण आटोपून मग दोघे फिरायला निघाले. आईचा निरोप घेत ते निघाले. "आई नमस्कार करते ती वाकुन पाया पडली." मानसच्या आईने खुनेनेच छान हा...! अस करत मानसकडे बघितले. यावर तो जरा लाजलाच. आईला बाय करून ते दोघे निघाले. "मग मॅडम कुठे जायचे सांगा.." "तुम्ही जिथे घेऊन जाल तिथे येऊ." यावर हसत दोघेही मेट्रो ट्रेन ने वर्सोवा बीचला निघाले.त्या मावळत्या सूर्याच्या समोर त्याने तिला एक गुलाबाचे फुल आणि चॉकोलेट देऊ केले. "वाह...!! हे कधी घेतलस तू...?" "घेतल होत तुझ्यासाठी..." त्यानेही हसुन सांगितलं. हळूच तिने त्याला मिठी मारली. सूर्य मावळतीला जात होता. काही वेळ बसुन ते देखील परतीच्या प्रवासाला निघाले. "चल लवकर जाऊया छोट्या बहिणीने आधीच बजावल आहे जीजू सोबतच सगळा बर्थडे नको मनवत बसूस आमच्यासाठी जरा वेळ ठेव. सो आपण निघुया" तिने हसुन त्याला सांगितलं. "जाताना फोटोही घ्यायचे आहेत आपल्याला चला." फोटोचं नाव येताच तो ही निघाला.
मेट्रो पकडून ते निघाले. त्याच्या खांद्यावर तीच डोक ठेवलं होत. मनात देवाचे आभार मानत होती ती. एवढा जीव लावणारा प्रियकर तिला मिळाला होता. "मनु उठ आपल स्टेशन आल." कधी ती झोपली तिलाच कळल नाही. "अरे सॉरी कधी झोप लागली कळलच नाही." "अग हो, होत असे कधी कधी. चला घरचे वाट बघत असतील." "तू येतो आहेस ना आज घरी." "अग आज नको नंतर येईन नक्की." "काय रे आज बोलला होतास ना." ती जरा लटक्या रागात बोलली. हे बघुन त्याने तिचा चेहरा स्वतःच्या ओंजळीत घेतला.. "हो पण आज नको नेक्स्ट टाईम पक्का." तिने ही समजून घेतलं. "बर चल मग आता मी पळते. नीट जा सांभाळून आणि मॅसेज टाक मला पोहोचलीस का कळलं का..!" "हो तू पण मॅसेज कर मला. हो करतो. बाय काळजी घे." बाय बाय.घरी सगळेच वाट बघत होते. घरीही छान सेलिब्रेशन झाल. परत एकदा केक कापण्यात आला. सर्वांसोबत गप्पा मारत जेवण झाली. फ्रेंड्स ही निरोप घेऊन घरी गेल्या. सगळ आवरून झोपण्याची तय्यारी झाली. आज खूप खुश होती मनस्वी तिला तिचा जोडीदार तिच्या मनासारखा मिळाला होता.तिचा नविन जॉब एम अन सी कंपनीमध्ये होता. मानसलाही चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळाला होता. एक दिवस तिने त्याला घरी यायचे निमंत्रण दिले. मानस नाही बोलु शकला नाही. मानस पहिल्यांदा घरी आला. घरी आई होती. त्याने वाकून नमस्कार केला. "अरे बाळा आपलाच घर आहे अस समज." जेवणाचा आग्रह झाला. शेवटी हो नाही करत त्याने थोडेसे खाल्ले. निघत असतानाच त्याची मोठ्या बहिणीसोबत ओळख झाली."बाबा नाहीत का घरी आज..?" मानस ने विचारले. "हो ते बाहेर गेलेत.." आई बोलली. "छोटी बहीण ही दिसत नाहीये बाहेर गेलीये का ती..?" ती क्लास ला गेलीये मनस्वी बोलली. "बर चला मी निघतो परत येईन." परत तिच्या आईच्या पाया पडत तो निघाला. आई मी सोडुन येते त्याला. "हो लवकर ये हा." हो आलीच म्हणत ती गेली. जवळच्या ऑटोस्टॅण्ड जवळ तिने त्याचा निरोप घेतला परत भेटण्यासाठीच वचन देत.
असेच वर्षे जात होती. दोघांचंही घरी येण जाण चालू असायच. त्यांची आवडती जागा होती 'तलाव-पाली' ते नेहमी तिकडेच भेटायचे. छान चालल होत सगळ. आजही ते भेटले होते त्यांच्या आवडत्या जागेवर. "ऐक ना मानस आपण कुठेतरी जाऊया ना मला खूप कंटाळा आलाय. उद्या सुट्टी आहे सो आपण जाऊया कुठेतरी मस्त." "कुठे जाऊया बर.." "अक्सा बीचला जाऊया का....?" मानस ने विचारले. मनस्वीने लगेच होकार दिला कारण खुप दिवस ते कुठे लांब गेले नव्हते. "पण लवकर जाव लागेल हा." तिने मानेनेच होकार दिला. "हो चालेल मग उद्या सहा वाजता मला स्टेशन ला भेट. ओके डन. मग गप्पा गोष्टी करत. दही-पुरी खात त्यांनी एक-मेकांचा निरोप घेतला. दुसऱ्या दिवशी भेटण्यासाठी.

"आई उद्या मी आणि मानस बाहेर जातोय हा." "कुठे निघालात..??" "अग आई बीच आहे एक तिकडे जाणार आहोत पूर्ण दिवस जाईल संध्याकाळीच येऊ." "बर लवकर या जास्त वेळ नका राहु बाहेर." "हो ग आई, मला उद्या पाच वाजता उठव." सगळी तय्यारी करून मनस्वी झोपली.
"मनु उठ पाच वाजलेत जायच आहे ना.." "हो उठली ग आई."To be continued


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED