कोरोनाचा वाढता प्रसार.... हलगर्जीपणा नको खबरदारी घ्या..! (नमस्कार मित्रांनो, कोरोनाच्या सावधगिरीबाबत आणि गंभीरतेबाबत आणखी एक लेख शेयर करतोय. कृपया, प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांचे पालन करा. जागरूक राहा.) तिकडे लोकांच्या दुर्लक्षपणामुळे इटलीमध्ये भीषण परिस्थिती उद्भवली आहे. दररोज बाधितांची संख्याच एवढी वाढते आहे की, उपचारासाठी हॉस्पिटल्स आणि सुविधाही अपुऱ्या पडायला लागल्या आहेत. लोकांना मरू दिलं जातंय, कारण उपचार करण्यासाठी पुरेशी साधणंच उपलब्ध नाहीयेत. सरकारला पूर्णपणे लॉकडाउन करावं लागलं आहे. तरीही अजून आपल्या लोकांना या गोष्टींचे गांभीर्य नाहीये. मोक्कार बाहेर फिरतायेत, हलगर्जीपणा करतायेत. वेळीच सावध व्हा, नाहीतर येणारे संकट इटलीपेक्षाही महाभयंकर रूप धारण करेल. आणि त्याचे इतके दूरगामी परिणाम होतील, कि त्यातून सावरायला