अंधारछाया - 3

  • 5.4k
  • 2.1k

अंधारछाया तीन बेबी स्वारगेटवर सुभाष, श्रीकांता आले होते पोहोचवायला. सुभाषच्या ऑफिसातले होते कोणी. त्यांच्या सोबतीने बसले मी सातच्या मिरज गाडीत. सुभाषला काळजी फार, ‘बेबी, पुस्तक घेतलीस का? काल आणलेली साडी ब्लाऊझ घेतलास का? दुपारच्या जेवणाचा डबा घेतलास ना? श्रीकांताला गाडी सुटायला निघता निघता केळी आणायला पिटाळलंन! ऑफिसच्या माणसाला सारखं सांगत होता, ‘प्रथमच जातेय एकटी. नीट लक्ष असू दे.’ मला तर हसूच येत होतं त्याच्या काळजीचं. जरा घाबरट आहे आमचा सुभा. एसटी चालता चालता केळी हातात पडली. हात हालवत दोघे दिसेनासे झाले. गाडी मेन रोडवर आली. दहा-बारा मिनटात कात्रजच्या वाटेवर लागली. ओसाड डोंगर, लांबवर सिंहगड पाहून मला एकाकी वाटलं. वाटलं, आपण