शंभराची नोट

(22)
  • 20k
  • 6.3k

उद्धव भयवाळ औरंगाबाद शंभराची नोट रघू कालपासून खूप खुश होता. त्याला कारणही तसेच होते. त्याच्या यमुनामावशीने पुण्याला परत जातांना रघूच्या हातावर शंभर रुपयांची नोट ठेवली होती. उन्हाळ्याच्या सुटीमध्ये पाच सहा दिवसांकरता यमुनामावशी पुण्याहून पैठणला रघूच्या आईला भेटायला आली होती. येतांना तिने रघूसाठी छान, छान कपडे आणले होते. तसेच रघूच्या, बाराव्या इयत्तेत असणाऱ्या स्नेहाताईला सुद्धा छान ड्रेस आणला होता. रघूला ते सर्वच कपडे खूप आवडले. या चार दिवसांमध्ये रघू सारखा मावशीच्या भोवतीभोवतीच होता. जूनमध्ये शाळा उघडतील तेव्हा रघू आता पाचव्या वर्गातून सहाव्या वर्गात जाणार होता. त्याने त्याची सहाव्या इयत्तेसाठी घेतलेली नवी पुस्तके मावशीला दाखविली. तसेच त्याने मावशीला