कॉलेजच्या दिवसांची

  • 5.1k
  • 2
  • 1.8k

कथा - कॉलेजदिवसांची ---------------------------------------------------------- मित्र हो - माझ्या कॉलेजची वर्षे - १९६८ ते १९७२ या शैक्षणिक वर्षातील आहेत . या अवधीत वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे .माझे पदवी पर्यंतचे शिक्षण दोन महाविद्यालयात झाले . अगोदर पहिल्या कॉलेजातील आठवणी सांगतो १.योगेश्वरी महाविद्यालय - अंबाजोगाई - १९६८ ते १९७१ ----------------------------------------------------------------------------------- या कॉलेजात ..पीयूसी -कॉमर्स ते ,फर्स्ट इयर आणि सेकंड इयर कॉमर्स पर्यंत शिकलो . एक गोष्ट अगोदरच सांगितलेली बरी ..ती ही की ..माझे शिक्षण ,माझी कॉलेज-जीवन "हे मुळीच चित्तथरारक , रोमांचकारक , अविस्मरणीय , व "प्रकरणे " वगेरे यांनी पूर्णपणे विरहित असे आहे ,त्यामुळे हे असे कसले जगणे ? असा प्रश्न पडू देऊ नका .