घरात परत रोशनी आली

(13)
  • 6k
  • 1.8k

मे महिन्याचे दिवस. संध्याकाळी ५-६ च्या दरम्यानची वेळ . नुकतेच बाहेरून आल्यामुळे प्रचंड गरम होत होते म्हणून आल्याआल्या दारे खिडक्या बंद करून एसी ऑन केला आणि सोफ्यावर रिलॅक्स झालो. थोड्या वेळात माझी बायको स्वप्ना म्हणाली… कुठून तरी बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय… पण मी दुर्लक्ष केले. पण थोड्या वेळात ती पुन्हा तेच म्हणाली. मी म्हटले बाजुला देवळात कोणीतरी लहान मुल घेऊन आले असेल ते रडत असेल – जाऊ दे पण ती अस्वस्थ झाली. बाहेर जाऊन बघितले तर देवळात शांतता होती. मग आवाजाचा कानोसा घेत ती मागच्या दारी गेली तर शेजारील चाळीच्या बंद दारातून लहान मुल रडत असल्याचे निष्पन्न झाले. आता तिच्यातली