प्रेम भावनेचा मृदू रंग भरणारा व्हायरस - 1

  • 10.3k
  • 4k

प्रेमभावनेचा मृदू रंग भरणारा व्हायरस १. प्रथम गणपती बाप्पाला नमस्कार करणे आणि मगच अॉफीसमध्ये पाऊल टाकणे.त्यासाठी खासकरून स्वागत कक्षातूनच जायचे. अॉफीसमध्ये जाऊन कंप्युटर चालू करायचे आणि थेट प्रोडक्शन लाइनवर जाऊन कामगारांची मिटींग घ्यायची. मिटींगमध्ये अदल्या दिवशीचा लेखाजोखा मांडायचा. त्यातील चुका टाळून कामात सुधारणा करून दिलेलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी काय करता येईल हे सांगायचं आणि एखाद्या दिवशी त्यांनी दिलेले टार्गेट पूर्ण केलेच, तर दिलेल्या टार्गेटच्या पुढे आणखी प्रोडक्शन कसं वाढवता येईल, यासाठी मार्गदर्शन (?) करायचं. मी दिलेल्या मार्गदर्शनावर आजपर्यंत कधी कुणाच्या डोक्यात कसलाच प्रश्र्न किंवा विरोध निर्माण झाला नाही. त्यामुळे मी स्वतःवरच खूष होऊन अॉफीसमध्ये येऊन बसायचो. त्यानंतर संध्याकाळी रिपोर्ट जमा