.... दिशा नवजीवनाची ...... तशी तिची व त्याची भेट हल्ली दीड महिन्यांपासून रोज बसस्थानकावर व्हायची. कामावर जाताना तो तिला नेहमीच बसस्थानकावर हे पाहायचा. बसस्थानकात पोहोचली की तिची नजर पहिली मनगटी-घड्याळावर जायची व उशीर झाल्याची तिच्या मनातील तगमग तिच्या चेहऱ्यावर दिसू लागायची. बस येईपर्यंत मोबाईल काढून ती थोडावेळ मोबाईल मध्ये टाईमपास करायची मध्येच मोबाईल मधून नजर हटवून बस येण्याच्या मार्गावर नजर रोखायची व बस न आल्यामुळे नाराजीची वलये चेहऱ्यावर उमटायची. तिचे सर्व हावभाव त्याला खूपच आवडायचे. तो अधूनमधून चोरुन तिला पाहत असे व ती आपल्यातच मग्न असायची. रीमा बसची वाट