वेडा बाळू - 2

  • 7.4k
  • 2k

त्या रात्री रावसाहेबांना झोपच लागली नाही. मनात बकुळाच्या आठवणींचा पूर आला होता. त्यांनी घड्याळात पाहिले. सकाळचे आठ वाजून गेले होते. बाळूदेखील गाढ झोपला होता. ती पेंटिंगमधली बाई त्याच्या स्वप्नात आली होती. ती बीछान्यावर पहुडली होती व बाळूकडे लडिवाळ हसत पाहत होती आणि बाळू एकेक पाऊल टाकत तिच्या जवळ जात होता. आता बाळू तिच्या अगदी जवळ आला होता इतक्यात त्याच्या पाठीत वेदना उसळली व पाठोपाठ रावसाहेबांचे तिखट शब्द त्याच्या कानावर आदळले. “भाsssssडया उठोतोस की हणू अजून एक लाथ पाठीत!” रावसाहेब कडाडले, तसा बाळू पाठ चोळतच उठला व थेट स्वयंपाकघरात गेला व पाचच मिनिटात हातात चहाचा कप