अंधारछाया - 8

  • 5.1k
  • 2.2k

अंधारछाया आठ मंगला कॅलेंडरचा नोव्हेंबर महिना फाडला. बेबीला येऊन आता दोन आठवडे झाले. डिसेंबरचे एकतीस दिवस. डिसेबर महिन्याचे पान फाडून नवे कॅलेंडर लावीन तेंव्हा काय झाले असेल? करायला घेतलंय हे आपण, पण निभेल ना असे मनात सारखे वाटे! मग ह्यांनी सांगितल्याचे आठवे. ‘मंगला, एक लक्षांत ठेव आपण तिच्या चांगल्यासाठीच करायला जातोय ना मग होऊ दे काहीही. तू सर्व भार स्वामींच्यावर सोपव. जपावर विश्वास ठेव. तूच म्हणालीस ना त्या दिवशी, स्वामींच्या फोटो, समोर तू प्रार्थना केलीस आणि बेबीच्या वागण्यात फरक पडला म्हणून?’ ‘हो बाई’ मी म्हणाले होते. डॉ फडणीसांनी पुन्हा चेक अपला बोलावले होते. एक दोन टॉनिक्स दिली म्हणाले, ‘दर आठवड्याला