शोध चंद्रशेखरचा! - 10

(11)
  • 6.9k
  • 1
  • 3k

शोध चंद्रशेखरचा! १०--- माणिकने चंद्रशेखरला घेऊन जाणाऱ्या गाडीची पाठ सोडली नव्हती.घाट उतरून त्या तरुणाची गाडी जेथे थांबली, तेथे हॉस्पिटल नव्हते तर, एक दोनमजली बांगला होता! साला काय झमेला आहे? हा तरुण चंद्रशेखरला घेऊन या घरापाशी का आलाय? माणिकचे अनुमान चुकल्याने तो बेचैन झाला. त्या तरुणाने चंद्रशेखरला गाडीतून काढून गेटच्या पोलला टेकून ठेवले. पोलवरली कॉल बेल दाबून तो झटकन गाडीत बसून निघालाही! आता आपण काय करायचे? माणिकच्या नजरेसमोर, चंद्रशेखरला हॉस्पिटलमध्ये नेणे गरजेचे होते! त्याने मागचा पुढचा विचार न करता, आपली गाडी बाजूला घेऊन थांबवली. झटक्यात दार उघडून, तो त्या गेट पर्यंत पोहंचला. त्याने चंद्रशेखरला खांद्यावर टाकले, तेव्हड्यात बंगल्याचे समोरचे दार उघडून