शोध चंद्रशेखरचा! - 11

(14)
  • 6.6k
  • 3.3k

शोध चंद्रशेखरचा! ११-- किरकोळ अपघाताने गायत्रीचे आयुष्य उद्धस्थ झाले होते. अपघातात तिचे दोन्ही पाय गेले होते. आणि ती व्हीलचेयरवर आली. पप्पाच्या माघारी तिने, त्यांच्या कंपनीचा डोलारा नुस्ता संभाळलाच नव्हता तर, तो वाढवून नावारूपाला आणला होता. मॅनेजमेंट मास्टर्स डिग्रीच्या शेवटच्या वर्षांपासून ती चंद्रशेखरच्या सम्पर्कात होती. मृदू बोलणारा, समोरच्याला न दुखावता, आपले टार्गेट गाठणारा हा तरुण तिला आवडला. हौशी होता. रसिक होता. नाटकात कामे पण करायचा. अभिनयाच्या अनेक ट्रॉफी त्याला मिळाल्या होत्या. तिने त्याच्याबरोबर लग्न केले. अर्थात पप्पांची संमती घेऊन. चंद्रशेखरच्या सॉफ्ट स्किलचा गायत्रीला, तिच्या व्यसायात फायदा होत होता. हळूहळू चंद्रशेखरचे कंपनीत वजन वाढत गेले. सगळे सुरळीत आहे, असे वाटत असताना तो