अंधारछाया - 9

  • 6.3k
  • 1.9k

अंधारछाया नऊ दादा मंगला आत बेबीकडून जप करून घेत होती. पडल्या पडल्या मी विचार करत होतो. आता यापुढे काय होईल? या संबंधी. भूत-पिशाच निकट नहीं आवै । महाबीर जब नाम सुनावै ।। हनुमान चालिसातील चरण आठवला! वाटले की ही भूत पिश्शाच योनी आपण मानतो! एखाद्याचा आत्मा अतृप्त राहिला की त्याची वासनापूर्ती होईतो आत्मा फिरत राहातो अंतरिक्षात. आपण पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो. या जन्माची फळे पुढच्या जन्मात भोगायची असे आपले शास्त्र सांगते. पुर्वीचे बारा जन्म आपण कोण कोण होतो याची स्मृती बहिणाबाई सारखी अडाणी संतबाई ही सांगते! इंग्लंड-अमेरिकेतही लोक आहेत बरेच ते ही आठवतात आपला पुर्वजन्म! म्हणजे आधीचा जन्म आणि आत्ताचा जन्म