मातेरा !! सकाळी सकाळी गंगूने सदाच्या हातात थैली दिली आणि म्हणाली, "सावकाराकडं जाऊन देखा कि पसाभर धान मिळतय का… लेकरं भुकानं याकूळ झालिया". "अवं तुला म्हाहीती हाये ना.. सावकार मला दारात बी उभा नही करत... मागच्या येळला त्यानं मह्या अंगावर कुत्रं सोडलं व्हतं" सदा पायावरची जखम बघत म्हणाला. "ते खरं हाये पर लेकरायच्या तोंडाकडं देखा कि वो...रातच्याला बी काही खाल्लं नाही लेकरांनी" गंगू डोळ्याला पदर लावून म्हणाली. "बरं..जातो म्या… पातो काय भेटलं तर", असं म्हणून सदा हातात थैली घेऊन सावकाराच्या दुकानाकडे चालू लागला. सावकाराच्या दुकानासमोर जाऊन.. हात जोडून विनवणी केली. "मालक… काय काम- बीम हाये का?" "अरे ! तु