अंधारछाया - 10

  • 7.5k
  • 2.7k

अंधारछाया दहा मंगला गुरूजींना आलो भेटून सांगलीहून. अजून सत्तेचाळीस माळा व्हायच्या होत्या. गुरूजी म्हणाले, ‘आता तीच करेल जप स्वतः. पाहू काय होतय ते. ही मंतरलेली विभूती देतोय ती फक्त सकाळी लावा. फरक दिसेल. नंतर हे आणि गुरूजी बसले होते बराच वेळ गप्पा मारत. मी बेबीला घेऊन, ब्रेड थोडी भाजीबीजी घेऊन स्टँडवर गेले. हे ‘लॉर्ड्समधे कटींग वगैरे करून येतो’ म्हणाले, ‘सावकाश.’ बेबी हात पाय धुवून बसली देवासमोर. माळ हातात घेऊन. म्हणाली, ‘करू सुरू माळा? तू आणि मी दोघीही म्हणूया बरोबरच! ‘चला, आज हात धरून म्हणावे लागले नाही म्हणायचे.’ असे म्हणत मी भाकरीचे पीठ मळायला घेतले आणि बेबी बरोबर जपाला लागले. बेबी