शोध चंद्रशेखरचा! १६--- "हू, बोल!" इन्स्पेक्टर इरावतीने मोबाईल कानाला लावला.तो कॉल तिच्या एका इंफॉर्मरचा होता.आज सकाळी लवकरच इरावती ऑफिसला आली होती. काही पेपरवर्क बाकी होते. "मॅडम, गायत्रीदेवी आणि चंद्रशेखरचे लव्ह मॅरेज होते. मुळात गायत्रीच्या वडिलांच्या कंपनीत, चंद्रशेखर नौकर होता. गायत्रीनेच त्याला कंपनीत घेतले होते. गायत्रीच्या लग्नानंतर त्यांचे वडील वारले. कंपनी गायत्रीकडे आली. गायत्रीचा अपघात झाला. त्यात तिचे पाय गेले. यात चंद्रशेखरचा हात असल्याची वंदता होती. तिच्या गैरहजेरीत कंपनी दुबळी झाली. पावर ऑफ अटॉर्नीच्या जोरावर चंद्रशेखरने कंपनी विकून टाकली! ज्या कंपनीनीने गायत्रीची कंपनी टेकओव्हर केली, आज तिचा मालक चंद्रशेखर आहे! गायत्रीशी घटस्फोट घेऊन, चंद्रशेखरने कस्तुरीशी लग्न केले. चंद्रशेखरच्या विश्वासघाताचे दुःख विसरण्यासाठी,