शोध चंद्रशेखरचा! १८--- घड्याळात पाचचा सुमार होता. कस्तुरी बैचैन झाली होती. अनोळखी फोनचा ती मागोवा घेणार होती. पर्स मधले पैश्याच्या ढिगल्यावरले, छोटे पिस्तूल पाहून तिला आधार वाटला. वेळ पाडलीतर बेधडक चाप दाबायचा, हे तिने ठरवून टाकले होते. बगलेत पर्स मारून ती निघाली. भिवंडी पर्यंत पोहचायला साधारण तासभर लागणार होता. पण मुंबईच्या ट्रॅफिकचा भरोसा नव्हता, म्हणून ती थोडेसे लवकरच निघाली होती. समजा, ती भिवंडीत लवकर पोहंचली तर, एखादे सिसिडे गाठून कोल्ड कॉफी विथ व्हॅनिला घेण्याचे तिने ठरवले. तिच्या अपेक्षेप्रमाणे ती सव्वासहाला भिवंडी एरियात पोहंचली. मजूर लोकांची वस्ती होती, तरी तिला एक रस्त्यालगतचे सिसिडे सापडलेच. तेथे अंडरग्राऊंड पार्किंगची सोय होती. ती गाडी